अभिष्टचिंतन:गरीब रुग्णांचे कैवारी - डॉ. यशवंत देशमुख

 गरीब रुग्णांचे कैवारी - डॉ. यशवंत देशमुख



       अनेकजण आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक असतात मात्र व्यवसाय सांभाळून जनसेवेचा वसा चालवण्याचा प्रयत्न करतात. आपला व्यवसाय करत गोरगरिबांना मदत करून इश्वर सेवेचा अनुभव घेऊन समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करतात. त्यापैकीच एक आहेत परळी शहरातील डॉ. यशवंत विठ्ठलराव (भाऊसाहेब) देशमुख. परळीच्या नामांकित कुटुंबात जन्माला आलेल्या डॉ. यशवंत देशमुख यांनी आपल्या कुटुंबाचे आणि घराण्याचे नाव उंचावण्याचे काम केले आहे. डाॅक्टर म्हटले उगाच मोठेपणाचा आव आणणारे असे लोक समजतात. मात्र डॉ. यशवंत देशमुख हे याला अपवाद आहेत. त्यांच्या वागण्या -बोलण्यात कुठेही बडेजाव दिसत नाही. त्यांच्याकडे आलेल्या रूग्णांचे पुर्ण समाधान झाल्याशिवाय ते स्वस्थ बसत नाहीत.

        वैद्यकीय शिक्षण पुर्ण करून डॉ. यशवंत देशमुख यांनी सन 2010 साली शहरात दवाखाना सुरू केला. परळी शहरात त्यांच्या नावाचे अगोदरच वलय असल्याने सुरुवातीपासूनच त्यांच्याकडे येणाऱ्या रूग्णांचा ओढा कायम होता. सुरुवातीला मोंढा विभागात असलेला दवाखाना त्यांनी पुढे कृष्णा टाॅकीज समोरील स्वतःच्या जागेत सुरू केला. या दवाखान्यांत त्यांनी व्यवसायापेक्षा सेवेला प्राधान्य दिले. म्हणूनच त्यांना रूग्ण देवासमान माणतात. जगाला भेडसावणाऱ्या कोरोना काळात अतिशय मोजक्या डॉक्टरांनी आपली सेवा सुरू ठेवली त्यामध्ये डॉ. यशवंत देशमुख यांचा समावेश होता. ज्या काळात कोणताही डॉक्टर आपल्या नेहमीच्या पेशंटलाही तपासत नव्हता त्या काळात डॉ. देशमुख यांनी आलेल्या रूग्णाला तपासणीशिवाय परत जाऊ दिले नाही. एवढेच नव्हे तर कोणताही दुजाभाव न करता प्रत्येक रूग्णाची अतिशय आस्थेवाईकपणे तपासणी करून त्याच्यावर उपचार करीत असत. विशेष म्हणजे कधीही रूग्ण आला तरी त्याला एकच तपासणी फिस घेण्याचा पायंडा त्यांनी पाडला आहे.

      दवाखाना म्हणजे रूग्णाकडून जमेल त्या मार्गाने पैसे काढण्याचा प्रयत्न केला जाणारच असा अनेकांचा समज. डॉ. यशवंत देशमुख यांनी रूग्ण सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि आजही त्याच भावनेने ते काम करतात. गोरगरीब रूग्णांना मदत करण्यातही ते नेहमी आघाडीवर असतात. रात्री अपरात्री आलेल्या रूग्णालाही चिडचिड न करता, न रागावता ते रूग्णाची सेवा करण्यात धन्यता मानतात. दवाखान्याच्या माध्यमातून सेवा करतानाच इतर मार्गानेही ते सामाजिक कार्यातही ते पुढाकार घेतात. शिक्षण, व्यवसाय आणि इतर कामासाठी मदत लागली तर ते सदैव तत्पर असतात. त्यांनी अनेक युवकांना मदत करून व्यवसाय उभे करण्यास मदत केली आहे.

      क्रिकेट, बॅडमिंटन आदी खेळांची आवड असलेले डॉ. यशवंत देशमुख सर्वच क्षेत्रातील गरजवंताला मदत करतात. विशेष म्हणजे त्यांना व्यायामाचा छंद आहे आणि त्यातुनच ते जीमकडे आकर्षित झाले. शारिरीक तंदुरुस्तीकडे त्यांचे विशेष लक्ष असते. त्यामुळेच शहरात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. डॉ. यशवंत देशमुख यांचे सर्वच क्षेत्रात वर्चस्व आहे. अगदी लहान थोरांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. अगदी कोणत्याही वयोगटातील व्यक्ती असेल तर त्यांचे संबंध मैत्रीचे आहेत आणि एकदा भेटलेला व्यक्ती दूर जाणार नाही याची सर्वांनाच खात्री आहे. अशा या अजातशत्रू आणि सर्वांना सोबत घेऊन चालणार्‍या अष्टपैलू व्यक्तीमत्वाचा आज वाढदिवस आहे.

    डॉक्टर यशवंत देशमुख यांना उदंड निरोगी आयुष्य लाभो .हीच प्रभू वैद्यनाथ चरणी प्रार्थना ...


- संदीप (भैय्या) चौंडे ,परळी वैजनाथ



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !