सोशल मीडिया पाॅवर: 'त्या' हरवलेल्या चिमुकल्याचे पालक भेटले



परळी वैजनाथ, प्रतिनिधी 

         शहरातील मोंढा भागामध्ये आयडीबीआय बँक परिसरात एक लहान मूल सापडले असून त्याला त्याच्या पालकाचे नावही सांगता येत नाही या मुलाचा व त्याच्या पालकाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू असून कोणाच्या ओळखी ओळखतील किंवा आपल्या हरवलेल्या मुलाचा शोध घेणाऱ्या पालकांनी त्वरित परळी शहर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले होते.

      सोशल मीडियाच्या माध्यमातून या लहान मुलाचा फोटो व हरवले असल्याची माहिती प्रसारित झाली यासाठी पत्रकार दीपक गित्ते तसेच प्रवीण मानधने यांनी प्रयत्न केले शेवटी पोलीस ठाण्यात या लेकराला आणले सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर ही माहिती व फोटो प्रसारित झाला आणि या चिमुकल्याच्या आई-वडिलांपर्यंत ही माहिती पोहोचली या चिमुकल्याची व त्याच्या आई-वडिलांची भेट झाली असून अंबलवाडी येथील पालकाच्या स्वाधीन या चिमुकल्याला करण्यात आले आहे आपल्या मुलाचा सांभाळ केल्याबद्दल पालकांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !