युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

आरोग्य शिबीरास भेट देवून परत येणार्‍या कारला अपघात: दोन तरूण डॉक्टरांचा मृत्यू

 आरोग्य शिबीरास भेट देवून परत येणार्‍या कारला अपघात: दोन तरूण डॉक्टरांचा मृत्यू



अंबाजोगाई (प्रतिनिधी)- 

आडस येथील आरोग्य शिबीरास भेट देवून परत येताना धरधाव वेगातील गाडीला शुक्रवार, दि. 9 जून रोजी दुपारी 12 वाजता अपघात झाला. या अपघातात दोन फिजिओथेरेफिस्ट करणार्‍या तरूण डॉक्टरांचा मृत्यू झाला. या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

 अंबाजोगाई येथील फिजिओथेरेफिस्ट डॉ.प्रमोद बुरांडे व त्यांच्या सोबत असलेले डॉ.रवी संतोष सातपुते हे आडस येथे ओमकार आकुसकर यांच्या वाढदिवसानिमित्त आडस गावामध्ये आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराला भेट देण्यासाठी हे दोघेही डॉक्टर तेथे गेेले होते. शिबीराला भेट देवून परत अंबाजोगाईकडे येत असताना चनईकडे जाणार्‍या उताराला गाडीचा भरधाव वेग असल्यामुळे समोरून येणार्‍या वाहनाला चुकविताना गाडीने हेलकावा घेतला आणि रस्त्यालगत असलेल्या झाडावर धडकली. या अपघातात डॉ.प्रमोद बुरांडे यांचा जागीच मृत्यू झाला तर डॉ.रवि सातपुते यांच्यावर स्वारातीत उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अंबाजोगाई शहरात नामांकित फिजिओथेरिफिस्ट म्हणून डॉ.बुरांडे यांची ओळख होती. मराठवाड्यासह राज्य-परराज्यातून त्यांच्याकडे उपचारासाठी रूग्ण येत होते. अपघाताची माहिती मिळताच ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी तात्काळ मदतीसाठी घटनास्थळावर धाव घेवून जखमींना स्वाराती रूग्णालयात पाठविले जखमी स्वारातीत येईपर्यंत प्रशासनाने सर्व डॉक्टरांची टिम अपघात विभागात सज्ज केली होती. अंबाजोगाई शहरातील निष्णात डॉक्टरांमध्ये त्यांची गणणा होत होती. त्यांच्या उपचारा पासुन अनेक रूग्णांना मुकावे लागणार आहे. या अपघातातील दोन तरूण डॉक्टरांचा मृत्यू झाल्यामुळे अंबाजोगाई शहरावर शोककळा पसरली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या