हातावरील टॅटू ठरला ओळखीसाठी दुवा

 'त्या' अर्धवट जळालेल्या मृतदेहाचा उलगडा ; हातावरील टॅटू ठरला ओळखीसाठी दुवा :परळी ग्रामीण पोलीसांनी आरोपी घेतला ताब्यात



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
       पो.स्टे. परळी ग्रामीण हद्दीत मांडेखेल शिवारातील रामनगर तांड्याजवळ अर्धवट जळालेला पुरुष जातीचा मृतदेह दिनांक ३०/०५/२०२३ रोजी सायं  ७ वा. सुमारास आढळुन आला होता. मृताची ओळख  पटविण्यासाठी ग्रामीण पोलीसांनी  शोधत्रिका विविध माध्यमातून व्हायरल केली होती.दरम्यानच्या काळात नांदेडच्या विमानतळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बेपत्ताच्या एका तक्रारीतील युवकाशी वर्णन जुळून आले. यावरुन परळी ग्रामीण पोलीसांनी या प्रकरणाचा संपूर्ण उलगडा केला आहे.विशेष म्हणजे  मृताच्या हातावरील 'स्नेहा' असा टॅटू ओळख पळविण्यात महत्त्वाचा दुवा ठरला.
        मांडेखेल शिवारातील रामनगर तांड्याजवळ अर्धवट जळालेला पुरुष जातीचा मृतदेह दिनांक ३०/०५/२०२३ रोजी सायं  ७ वा. सुमारास आढळुन आला होता. पो.हे.कॉ. १४२९ आर.पी. केकान यांनी दि.३१/०५/२०२३ रोजी सरकारतर्फे फिर्यादी होवुन अज्ञात आरोपी विरुध्द कलम ३०२, २०१ भा. दं.वी. प्रमाणे तक्रार दिली असुन पो.स्टे.ला गु.र.नं. १५९ / २०२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस अधिक्षक श्री नंदकुमार ठाकुर , अपोअ अंबाजोगाई श्रीमती कविता नेरकर, पोलीस उपविभागीय अधिकारख अंबाजोगाई श्री. चोरमले, पोलीस निरीक्षक एस.एस. चाटे यांच्या मार्गदर्शनाखालीया गुन्हयाचा पुढील तपास सपोनि एन.व्ही. गिते हे करत असुन गुन्हयाचे तपासात पो.हे.कॉ.१४२९ आर.पी.केकान, पो.ना. १८२९ एन.डी.हरगावकर व .पो.कॉ. १५५० एस.पी. अन्नमवार हे मदत करत आहेत.

           गुन्हयाचे तपासात यातील मयताचे फोटो, त्याच्या उजव्या हातावर असलेला स्नेहा नावाचा टॅटुचा फोटो व शारिरीक वर्णनाची शोध पत्रीका तयार करुन सोशल मिडीयाच्या माध्यमातुन संपुर्ण महाराष्ट्र राज्यात पाठविण्यात आली होती. घटनास्थळावर मिळुन आलेल्या डिझेलच्या बाटलीच्या आधारे परळी शहराचे आजु बाजुचे सर्व पेट्रोल पंपावर तपास करण्यात आला. तसेच घटनास्थळाचा डम्पडाटा घेण्यात आला.
          सीसीटीएनएस प्रणालीच्या मदतीने संपुर्ण महाराष्ट्र राज्यात दररोज दाखल होणाऱ्या मिसींगबाबत नियमीत माहिती घेवुन प्रत्यक्ष संपर्क करत असताना दि. ०४/०६/२०२३ रोजी पोलीस ठाणे विमानतळ जिल्हा नांदेड यांच्याकडून माहिती मिळाली की, त्यांच्या पोलीस ठाणेस दाखल असलेली मिसींग क्र. ३५/२०२३ मध्ये बेपत्ता इसम नामे सचिन परमेश्वर शिंदे वय २४ वर्ष याचे वर्णन या गुन्हयातील मयताच्या वर्णनाशी जुळत आहे. अशी माहिती मिळाल्यावरुन प्रथमतः या मिसींग मधील बेपत्ता ईसम आणि मयत ईसम हे एकच असल्या बाबत खात्री करून आरोपी फरार होवु नयेत म्हणुन गोपनीयता ठेवुन पोलीस ठाणे विमानतळ नांदेड यांच्याशी संपर्कात राहुन खून करणारे आरोपी निष्पन्न करुन पो.स्टे. विमानतळ येथील पो.नि. नरवाडे, सपोनि विजय जाधव, सपोउपनि बाबा गजभार, दारासिंग राठोड, बंडु कलंदर, दत्तात्रय गंगावरे, दिगांबर डोईफोडे, अंकुश लांडगे यांनी आरोपी नामे दिलीपसिंग पवार यास ताब्यात घेवुन पोलीस ठाणे परळी ग्रामीण येथे कळविल्याने या आरोपीस दि. ०७/०६/२०२३ रोजी ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने आपसातील जुन्या भांडणाच्या कारणावरुन सचिन गोविंद जाधव याच्या मदतीने सचिन परमेश्वर शिंदे यास भोकसुन मारले असुन सचिनचे प्रेत ओळखु येवु नये म्हणुन त्याच्या अंगावर डिझेल टाकुन जाळले असल्याचे कबुल केले आहे.

     आरोपी  दिलीपसिंग हरिसींग पवार यास अटक करुन परळी कोर्टात  हजर करुन गुन्हयाचे तपासकामी दिनांक १४/०६/२०२३ रोजी पावेतो ०७ दिवसाची पोलीस कोठडी मंजुर करुन घेतली असल्याचे पोलीसांनी सांगितले. गुन्हयातील फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे. गुन्हयाचा पुढील तपास पो.नि. श्री. एस. एस. चाटे हे करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार