वैद्यनाथ कॉलेजमध्ये योग दिन साजरा        



   
         


   परळी ... जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ महाविद्यालय मध्ये एन सी सी विभाग व एन एस एस विभाग यांच्या सयुक्त विद्यामाने योगादिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी योग शिक्षक विवेक आघाव यांनी योगा विषयी माहिती देऊन योगासने सर्व व  प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून करून घेतले. त्यात सुक्ष्म योगासने, व्यायाम शरीरासाठी किती आवश्यक आहे हे सांगितले. पोटाचे, पाठीचे विकार दूर करण्यासाठी योगासने करणे आवश्यक आहे असे श्री आघावं यांनी सांगितले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे व्ही  जगतकर यांनी शरीर सदृढ ठेवण्यासाठी योगासने मह्त्वपूर्ण आहेत असे सांगितले. या कार्यक्रमाला डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील विद्या परिषद सदस्य प्रा डॉ पी एल कराड , उपप्राचार्य हरीश मुंडे, समन्वयक प्रा.उत्तम कांदे,एन एस एस विभाग प्रमुख डॉ. माधव रोडे एनसीसी विभाग प्रमुख कॅप्टन गणेश चव्हाण यांच्या सह  प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.


••••






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !