MB NEWS:अधिकाधिक दिव्यांगांनी लाभ घेण्याचे प्रतिष्ठानचे आवाहन

 गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवारी परळीत दिव्यांग पूर्व तपासणी शिबीराचे आयोजन

अधिकाधिक दिव्यांगांनी लाभ घेण्याचे प्रतिष्ठानचे आवाहन


परळी । दि. ३१ ।

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या पुण्यस्मरणानिमित्त केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालय व गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग पूर्व तपासणी आणि नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, या शिबिरात अधिकाधिक दिव्यांग बांधवांनी सहभाव नोंदवावा असे आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.


समाज कल्याण विभाग आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्हाभरात सुरू असलेल्या पूर्व तपासणी आणि नोंदणी शिबिर शुक्रवारी परळी उपजिल्हा रुग्णालयात पार पडणार आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी समाजातील वंचित उपेक्षितांच्या उत्थानासाठी तहहयात कार्य केले, त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त दरवर्षी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान समाजोपयोगी उपक्रम राबवित असते. यंदाही प्रतिष्ठानच्या वतीने गरजू ,निराधार आणि दुर्लक्षित घटकांना आधार देणारा उपक्रम राबविला जाणार असून सकाळी दहा ते सांयकाळी सहा या वेळेत शिबीर चालणार आहे.


*प्रमाणपत्रांची चिंता करू नका.. खा. प्रितमताईंच्या सहीने होणार नोंदणी*


शिबिरात नोंदणी आणि पूर्व तपासणीसाठी दिव्यांग बांधवांकडे आवश्यक असलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि अपंगत्वाचे प्रमाणपत्र नसेल तर दिव्यांगांनी चिंता करू नये. नोंदणीसाठी आवश्यक असलेले नमूद दोन्ही प्रमाणपत्र खा. प्रितमताई मुंडे यांच्या सहीनिशी त्यांच्या पत्रावर देण्यात येणार आहे.तथापि कागदपत्रांअभावी नोंदणी आणि शिबिराचा लाभ घेण्यापासून कुणीही वंचित राहणार नाही.


••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !