MB NEWS:151 मुलांना दहावीत 100 टक्के; पैकी 108 लातूरचे

 151 मुलांना दहावीत 100 टक्के; पैकी 108 लातूरचे


राज्यात 10 वी बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून निकालाचा टक्का 3.11 ने घसरला आहे. असे असले तरी 10 वीत 100 टक्के मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 151 वर पोहोचली आहे.


विशेष म्हणजे 151 पैकी 108 मुले ही लातूर विभागातील आहेत. पुण्यातून 5, औरंगाबाद - २२, मुंबई - ६, अमरावती - ७, लातूर - १०८, कोकण - ३ इतक्या विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहे. राज्याचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा दहावीच्या निकालात 3.11 टक्क्यांनी घसरण झाली आहे. तर राज्यात 100 टक्के मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 151 आहे.राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल (SSC Result) जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. यंदा दहावीच्या निकालाची टक्केवारी घसरली आहे. 2020 मध्ये दहावीचा निकाल 95.30 टक्के, 2021 मध्ये 99.95 टक्के तर 2022 मध्ये 96.94 टक्के निकाल लागला होता. यंदा 93.83 टक्के निकाल लागला आहे. याचाच अर्थ यंदा निकालात 3.11 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर दिव्यांगाच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 92.49 टक्के आहे. याशिवाय 29.74 टक्के शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
दहावीचा निकालाची वैशिष्ट्ये


* राज्याचा दहावीचा निकाल 93.83 टक्के
* पुनर्परीक्षार्थींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 60.90 टक्के
* खाजगी विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 74.25
* दिव्यांगाच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 92.49 टक्के 
* राज्यात सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा 98.11टक्के
* एकूण 25 विषयांचा निकाल 100 टक्क्यांपेक्षा जास्त. 
* मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 3.82 टक्क्यांनी जास्त.
* राज्यातील 5,26210 विद्यार्थ्यी प्रथम श्रेणीत, 3,34,015 द्वितीय श्रेणीत तर 85218 उत्तीर्ण. 
* 14 जूनला विद्यार्थ्यांना गुणपत्रिका शाळेत उपलब्ध होतील
* यावर्षी दहावीचा निकाल 93.83 मागील वर्षी तो 96.94 टक्के होता. याचा अर्थ मागील वर्षीपेक्षा 3.11 टक्क्यांनी निकाल घटला.
* 2020 मधील निकालाशी तुलना करता यावर्षीचा निकाल 1.47 टक्के
* जिल्हा निहाय 3 टॉप- सिंधुदुर्ग 98.54 टक्के, रत्नागिरी 97.90 टक्के, कोल्हापूर 97.21 टक्के
* 29.74 टक्के शाळांचा निकाल 100 टक्के
* राज्यात 100 टक्के मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 151
* राज्यात 23 तृतीयपंथी विद्यार्थी उत्तीर्ण


विभागवार निकाल


कोकण : 98.11 टक्के
पुणे : 95.64 टक्के
कोल्हापूर : 96.73टक्के
औरंगाबाद : 93.23 टक्के
नागपूर : 92.05 टक्के
अमरावती : 93.22 टक्के
नाशिक : 92.22 टक्के
लातूर : 92.67 टक्के
मुंबई : 93.66 टक्के

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !