MB NEWS:वैद्यनाथ कॉलेजमध्ये मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा सुरू

 वैद्यनाथ कॉलेजमध्ये मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा सुरू



परळी, प्रतिनिधी....... जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमधील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्रात बीए, बी कॉम , एम ए,एमबीए या शिक्षणक्रमाच्या परीक्षेला  29 मे पासुन सुरुवात झालेली आहे. या परीक्षेसाठी जवळपास 500 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. जे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून अशा प्रकारचे शिक्षण दिल्या गेल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होत आहे , हे विद्यापीठ वंचित, उपेक्षित विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन एक स्तुत्य उपक्रम राबवित आहे , आमच्या अभ्यासक्रम चांगल्या प्रकारे परीक्षा होत आहे अशी प्रतिक्रिया अभ्यासकेंद्राचे केंद्रप्रमुख तथा प्राचार्य , डॉ जे व्हि जगतकर यांनी मध्यामांशी बोलताना दिली. सदर परीक्षा करिता विद्यापीठाकडून शंकरराव पाटील महाविद्यालय भूम येथील हिंदी विभागाचे बहिस्थ पर्यवेक्षक डॉ संतोष रोडे, अभ्यास केंद्राचे केंद्र संयोजक व अंतर्गत पर्यवेक्षक डॉ.बी.के.शेप, साह्यक डॉ आर डी राठोड, तांत्रिक सहाय्यक श्री जे एम चेंडके, शिक्षकेत्त्तर कर्मचारी श्री जी बी किटे, समाधान जगताप हे कर्मचारी ही परीक्षा यशस्वीते करिता परिश्रम घेत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार