MB NEWS:श्रीकांत झंवर ची कामगार अधिकारी म्हणून निवड

 पिग्मी एजंटच्या मुलाची एमपीएसीत भरारी


श्रीकांत झंवर ची कामगार अधिकारी म्हणून निवड

सेलू,प्रतिनिधी : जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर कठीण परिस्थितीवर मात करत परभणी येथील पिग्मी एजंट प्रदीप झंवर यांचा मुलगा श्रीकांत याने एमपीएसी परिक्षेत यश मिळवत कामगार अधिकारी पदावर भरारी घेतली आहे. त्याच्या या निवडीचे जिल्ह्यात विविध स्तरातून कौतुक होत आहे.


जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील मारवाडी गल्ली येथील प्रदिप झंवर  रहिवाशी आहेत. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. एका खाजगी बॅकेत दररोज फिरून पिग्मी एजन्ट म्हणून तसेच डाकघर मध्ये विविध ग्राहकांची आर डी जमा करणे आणि एलआयसी मध्ये विमा प्रतिनिधी म्हणून ते काम करतात. त्यातून मिळणा-या तूटपुंज्या उत्पन्नावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागतो. मात्र त्यांचा मुलगा श्रीकांत याने अशा परिस्थितीतही जिद्द आणि चिकटीच्या जोरावर एमपीएसीत यश संपादन केले आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण सेलूत झाले. त्यानंतर अकरावी, बारावी परभणीतील महाविद्यालयात पुर्ण केले व सोबत आयआयटी मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी तयारी केली. बारावीत चागंले गुण मिळाल्यानंतरही त्याचा अपेक्षेप्रमाणे चांगले IIT महाविद्यालय भेटू शकले नाही. मात्र AIEEE आणि MHTCET छान गुण असल्याकारणाने श्रीकांत झंवर याने पुणे येथील नामांकित पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी येथून बी. ई. (इलेक्ट्रोनिक्स अँड टेली कमुनिकेशन) चे शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर त्याला IT क्षेत्रात नोकरी देखील मिळाली होती, मात्र अधिकारी होण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवत त्याने ती संधी नाकारली. सुरवातीला पुण्यात मित्रांच्या खोलीवर व नंतर MVPM या संस्थेच्या मदतीने हॉस्टेल वर राहून त्याने राज्यसेवेची तयारी सुरू केली. मात्र कोरोनामुळे लाॅकडाऊन झाल्यानंतर तो आपल्या सेलू या गावी परतला. याकाळात त्याने राज्यसेवेची तयारी सुरूच ठेवली. सुरवातीला परिक्षेच्या माध्यमातून पास होऊन तो तलाठी झाला मात्र लॉकडाऊनमध्ये सरकारी नियुत्यांवर स्थगिती असल्याकारणाने त्याची तलाठी म्हणून नुकतीच कोरेगाव जि. सातारा येथे नियुक्ती करण्यात आली. दरम्यानच्या काळात त्याची भारतीय कृषी अनुसंधान परिषद ICAR मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत अखिल भारतात २० वे रँक मिळवून Technician Researcher ह्या पदी निवड झाली. मात्र अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगल्यामुळे त्याचे यावर समाधान झाले नाही. शासकीय अधिकारी म्हणू  काम करण्याची तीव्र भावना त्याच्या मनात होती. कुठलेही खाजगी क्लास न लावत स्वतः वर विश्वास ठेवून राज्यसेवेची तयारी त्याने सुरूच ठेवली. शेवटी त्याचे परिश्रम फळाला आले. नुकत्याच लागलेल्या राज्यसेवेच्या निकालात श्रीकांत याची कामगार अधिकारी (राजपत्रित अधिकारी) पदावर निवड झाली आहे. 


कठोर परिश्रम घेण्याची तयारी आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यानंतर निश्चित यश मिळते. यात मला नेहमी प्रेरणा देणारे, माझ्या प्रत्येक प्रसंगात मला साथ देणारे आई, वडील आणि कुटुंबातील सर्व स्नेही आणि मित्रवर्ग यांना हे संपूर्ण यश व यशाचे श्रेय जाते. उपजिल्हाधिकारी बनण्याचे स्वप्न असल्याने पुढे ही प्रयत्न चालूच असणार अशी प्रतिक्रिया श्रीकांत झंवर याने व्यक्त केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !