MB NEWS:परळी शहरातील पठाण शारीया अखिलखान दहावीत बीड़ जिल्हातुन उर्दू माध्यमातुन प्रथम

 परळीतील पठाण शारीया अखिलखान दहावीत  बीड़ जिल्हातुन उर्दू माध्यमातुन प्रथम




परळी वैजनाथ, प्रतिनिधी...    दि. 02 जून 2023 रोजी जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य व माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला आहे. सध्या राज्यभरात दहावीचा निकाल जाहीर झाला आहे यात पुन्हा एकदा राज्यात मुलींनी बाजी मारल्याचे पाहिलाय मिळत आहे त्यातच परळी येथील हजरत बिलाल शाळेतील विद्यार्थिनी पठाण शारिया अखिलखान याने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९७.४० टक्के गुण घेऊन जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.  

पठाण शारिया अखिलखान याचे या  यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.सुरुवातीपासून ती शाळेत एक हुषार विद्यार्थिनी म्हणून परिचित आहे.

पठाण शारिया अखिलखान यांनी गणित विषयात १०० पैकी  १०० गुण घेऊन यश संपादन केली आहे पठाण याला उर्दू विषयात ९५ , विज्ञान ९८ असे एकुण ५०० पैकी ४८७ गुण मिळाले आहे. शहरातील अमीरपुरा येथील रहिवाशी पठाण अखिल खान सर यांची मुलगी व सय्यद खालेद राज यांची नातू आहे. पठाण शारिया अखिलखान याचे यशाबद्दल शिक्षक , नातेवाईक, मित्रपरिवार कौतुक करून अभिनंदन करत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !