MB NEWS:अंबाजोगाई बसस्थानक वाढविस्तार व आधुनिकीकरण कामाचे उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

 अंबाजोगाई बसस्थानक वाढविस्तार व आधुनिकीकरण कामाचे उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण


अंबाजोगाई, प्रतिनिधी....
              अंबाजोगाई बसस्थानक वाढविस्तार व आधुनिकीकरण कामाचे उद्या ३ जुन रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण  होणार आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अंबाजोगाई बसस्थानकाचे वाढविस्तार व आधुनिकीकरण कामाचा दृकश्राव्य प्रणाली (व्हि.सी.) व्दारे लोकार्पण होणार आहे.
      लोकार्पण सोहळा शनिवार दि. ०३ जुन २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बसस्थानक, अंबाजोगाई, ता. अंबाजोगाई, जि. बीड येथे आयोजित करण्यात आला आहे. लोकार्पण मुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य एकनाथ संभाजी शिंदे यांच्याहस्ते तरमंत्री, सहकार, इतर मागास बहुजन कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, बीड जिल्हा अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी राज्यसभा सदस्य रजनीताई पाटील,डॉ.प्रितमताई मुंडे लोकसभा सदस्य, बीड,विधान परिषद सदस्य सुरेश धस, विधानसभा सदस्य, केज नमिताताई मुंदडा ,विधानसभा सदस्य, गेवराईअॅड. लक्ष्मण पवार
विधान परिषद सदस्य विक्रम काळेविधानसभा सदस्य, माजलगाव प्रकाश सोळंकेविधानसभा सदस्य, बीड संदिप क्षीरसागर विधान परिषद सदस्य सतिश चव्हाण विधानसभा सदस्य, परळी वै. धनंजय मुंडे विधानसभा सदस्य, आष्टी बाळासाहेब आजबे जिल्हाधिकारी, बीड दिपा मुधोळ - मुंडे (M (भा.प्र.से.) आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
          या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अजित पवार (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.बीड,नंदकुमार ठाकुर (भा.पो.से.) पोलीस अधीक्षक, बीड,शेखर चन्ने (भा.प्र.से.) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई,अजयकुमार मोरे विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, बीड यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार