MB NEWS:दगडवाडी येथे राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात साजरी

 दगडवाडी येथे राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात साजरी


परळी प्रतिनिधी.  तालुक्यातील दगडवाडी येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांची 298 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात दगडवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक सौदागर कांदे यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

    दगडवाडी येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली तात्या गडदे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. सदस्य प्रा. डॉ. मधुकर आघाव, सामाजिक कार्यकर्ते भीमराव सातपुते, सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विकास बिडगर, अहिल्याबाई होळकर विद्यापीठ सोलापूर सदस्य शिवदास बिडगर, ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड, प्रमुख वक्ते नवनाथ दाने, दादाहरी वडगावचे सरपंच शिवाजी कुकर, श्रीकांत मुलगीर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

     कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते नवनाथ दाणे, रानबा गायकवाड यांनी आपले विचार मांडले. याच कार्यक्रमात दगडवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे आदर्श शिक्षक सौदागर कांदे यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मित्र मंडळ दगडवाडी यांच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौदागर कांदे यांनी केले.

   कार्यक्रमास रामकिशन यमगर, विष्णू यमगर यादवराव यमगर, यांच्यासह गावकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  प्रभाकर यमगर गोविंद यमगर, विष्णू यमगर, गणेश चौंडे, प्रभू यमगर, नामदेव यमगर , विठ्ठल यमगर, हनुमंत यमगर, लिंबाजी यमगर, गणेश यमगर, बालासाहेब यमगर, मधुकर तांदळे, मुंजा यमगर, गंगाधर यमगर, सतीश यमगर आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !