MB NEWS:जलजीवन मिशनमधून अंबाजोगाई तालुक्यातील पिंपरी गावच्या पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन

 संघर्षाच्या काळात पिंपरी गाव माझ्या पाठीशी होते, गावच्या विकासाचा अनुशेष भरून काढणार - धनंजय मुंडे

जलजीवन मिशनमधून अंबाजोगाई तालुक्यातील पिंपरी गावच्या पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन 


परळी वैद्यनाथ (दि.1) - 2002 साली मी पहिली निवडणूक पट्टीवडगाव गटातून लढवली, तेव्हापासून माझ्या प्रत्येक संघर्षाच्या काळात पिंपरी हे गाव कायम पाठीशी राहिले. आज या गावच्या पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन करताना मला आनंद होत आहे. घराघरात पाणी आणण्याचे पुण्य मला लाभत आहे. गावाच्या संपूर्ण विकासाचा अनुशेष भरून काढण्याची जबाबदारी माझी आहे, असे मत माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे. 


आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते जलजीवन मिशनमधून पिंपरी गावच्या पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ करण्यात आला, त्याप्रसंगी धनंजय मुंडे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. 


सत्ता असो वा नसो, परळी वैद्यनाथ मतदारसंघात विकासाची प्रक्रिया थांबणार नाही. पिंपरी गावाने मला कायम प्रेम दिले आहे. त्या प्रेम व विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, असेही धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले. 


याप्रसंगी परळी विधानसभा अध्यक्ष गोविंदराव देशमुख, पिंपरीचे सरपंच काशिनाथ कातकडे, विश्वांभर फड, माऊली बप्पा जाधव, राजवर्धन दौंड, माधवराव लव्हारे, सुधाकर माले, सत्यजित सिरसाट, गौतम चाटे, बबनराव मुंडे, चंदनवाडीचे सरपंच ज्ञानेश्वर गित्ते, साळुंकवाडीचे सरपंच भगवान कर्वे, बाभळगावचे सरपंच रमेश करपे, गोविंद कांदे, सज्जन दराडे, अशोक चाटे, बाळासाहेब सोनवणे, महेबूब शेख, सीताराम हाडबे, बालासाहेब भताने, यांसह आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !