MB NEWS:प्रभुवैद्यनाथाच्या पूजनाने जिल्हा दौऱ्यास सुरुवात; शिवसेनिकांत उत्साहाचे वातावरण

 बीड जिल्ह्यात शिवसेना क्रमांक एकचा पक्ष करण्याचा ध्यास घेऊन कामाला लागलोय : रत्नाकर शिंदे


प्रभुवैद्यनाथाच्या पूजनाने जिल्हा दौऱ्यास सुरुवात; शिवसेनिकांत उत्साहाचे वातावरण

परळी वै (प्रतिनिधी): शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे यांचा आज परळी येथून प्रभू वैजनाथ चे पूजन करून बीड जिल्हा दौऱ्यास सुरुवात करण्यात आली शिवसेना मध्यवर्ती कार्यालय परळी वैजनाथ येथे तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीत बोलताना शिवसेना बीड जिल्ह्यात क्रमांक एकचा पक्ष करण्याचा ध्यास घेऊन कामाला लागले तसेच परळी तालुक्यात व्यंकटेश शिंदे यांच्या नेतृत्वात पक्ष वाढीचे कार्य सर्व शिवसैनिकांनी मिळून करावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे यांनी केले.

परळी येथील बैठकीत शिवसैनिकांत उत्साहाचे वातावरण दिसून आले फटाक्यांची आतिषबाजी करून जिल्हाप्रमुखांचे स्वागत करण्यात आले यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे, शहर प्रमुख राजेश विभुते, विधानसभा प्रमुख राजा भैया पांडे, जिल्हा सह संघटक रमेश चौंडे, ज्येष्ठ नेते भोजराज पालीवाल, नारायणराव सातपुते, जगन्नाथ साळुंके, युवा सेना जिल्हा उपप्रमुख दीपक शिंदे, तालुकाप्रमुख संतोष चौधरी, तालुका संघटक हनुमान भारती, उप तालुकाप्रमुख शंकर डाके, उपशहर प्रमुख मोहन राजमाने, अनिल शिंदे, नागेश मुरकुटे, संतोष भोसले, विजय राठोड, गंगाधर साबळे, राधाकिसन नाईकनवरे,  बाबा सोनवणे, मोहन परदेशी, राजेश शिंदे, कृष्णा सुरवसे, सुदर्शन यादव, सोमनाथ काळे, रामभाऊ घोलप, गोविंद गरड, अजय आव्हाड, विश्वनाथ पंजरकर, श्रीनाथ विभूते, संजय सोमाणी, नरसिंह पौल, प्रदीप देशमुख, विशाल शिंदे,सतीश पवार, आकाश अंबिलवादे, संतोष साखरे,  महिला आघाडीच्या विद्याताई गुजर, लक्ष्मीताई सरवदे, जमुनाताई साखरे, प्रमिलाताई लांडगे, यांच्यासह तालुक्यातील व शहरातील पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार