इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यभरात ताकद लावली; पण वर्धापन दिन मेळावा अचानक पुढे ढकलला, कारण...

 राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यभरात ताकद लावली; पण वर्धापन दिन मेळावा अचानक पुढे ढकलला, कारण...

मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र भूषण सन्मान वितरण सोहळ्यात उष्माघातामुळे लोकांचे बळी गेल्याने आता राजकीय पक्षांनी हवामानाची चांगलीच धास्ती घेतली आहे. मैदानातील जाहीर कार्यक्रम घेण्यासाठी सरकारनेही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तसेच संभाव्य दुर्घटना आणि टीका टाळण्यासाठी राजकीय पक्षही दक्षता घेऊ लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वर्धापन दिनाचे औचित्य साधून ९ जून रोजी अहमदनगरला मेळावा आयोजित केला होता. उन्हाचा त्रास नको म्हणून हा मेळावा सायंकाळी ठेवण्यात आला होता. मात्र आता, हवामान बदलले असून हवामान विभागाने चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. त्यामुळे सावध होत राष्ट्रवादी काँग्रेसने हा मेळावा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली आहे.


राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या नगर जिल्ह्यात शक्तिप्रदर्शन करण्यासाठी पक्षाने हा मेळावा आयोजित केला होता. नगरसह शेजारच्या जिल्ह्यातील नेत्यांवर त्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. केडगाव येथील मैदानाची जागा निश्चित करून त्यावर तयारीही सुरू करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे येऊन तयारीची पाहणी केली होती. आढावा बैठकही घेतली होती. मात्र, आज हवामान विभागाचा अंदाज आल्याने हा मेळावा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.

राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या २५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाचा कार्यक्रम ९ जून २०२३ रोजी, केडगाव, अहमदनगर येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र, वेधशाळेच्या माहितीनुसार पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची दाट शक्यता आहे. या बिपरजॉय चक्रीवादळामुळे वेधशाळेने राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सामान्य नागरिक व प्रशासनाची गैरसोय होऊ नये म्हणून तसेच वेधशाळेच्या सतर्कतेच्या इशाऱ्याचे पालन करून आपण वर्धापनदिनाचा हा कार्यक्रम पुढे ढकलत आहोत, अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी दिली.

दरम्यान, मेळावा रद्द करण्यात आला नसून पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, पुढील तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे. अर्थात लवकरच पावसाळा सुरू होणार असल्याने मोकळ्या मैदानात कार्यक्रम घेणे कठीण होणार आहे. त्यामुळे यासंबंधी काय निर्णय होतो, याकडे नगरच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!