MB NEWS:वैद्यनाथ व अंबासाखर निवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या संचालकांचा धनंजय मुंडेंनी केला सत्कार

 वैद्यनाथ व अंबासाखर निवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या संचालकांचा धनंजय मुंडेंनी केला सत्कार


परळी वैद्यनाथ (दि. 02) - परळी तालुक्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना व अंबाजोगाई तालुक्यातील अंबासाखर सहकारी साखर कारखाना या दोन्हीही कारखान्यांच्या निवडीमध्ये बिनविरोध संचालक पदी निवडून आलेल्या नवीन संचालकांचा आमदार धनंजय मुंडे यांनी त्यांच्या जगमित्र संपर्क कार्यालयात सत्कार करून शुभेच्छा दिल्या. 


वैद्यनाथ कारखान्याच्या निवडणुकीत अजय मुंडे, वाल्मिक अण्णा कराड, ज्ञानोबा मुंडे, हरिभाऊ गुट्टे, वसंत राठोड, चंद्रकांत कराड, सुधाकर शिनगारे, सत्यभामाताई आघाव, मंचक घोबाळे तसेच सचिन दरक हे धनंजय मुंडे गटाचे 10 संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. 


त्याचबरोबर अंबासाखर साखर कारखाना निवडणुकीत दत्ता आबा पाटील, राजाभाऊ औताडे, लालासाहेब जगताप, जिवन कदम, बालासाहेब किर्दत, मधुकर शेरेकर असे धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात दत्ता पाटील गटाचे एकूण 7 संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. 


या सर्व नवनिर्वाचित संचालकांचा धनंजय मुंडे यांनी सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार