इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:शाळेचा या ही वर्षी १००% निकाल

 भेल सेकंडरी स्कूलची सर्वोच्च निकालाची उज्वल परंपरा कायम


 शाळेचा या ही वर्षी १००% निकाल



परळी वै ( प्रतिनिधी):


 भेल सेकंडरी स्कूल ही परळी वै.  तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील नामांकित शाळा आहे. विध्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शाळा सतत कार्यशील असते. विध्यार्थ्यांची प्रगती हीच देशाची प्रगती असते. विध्यार्थी हा देशाचा कणा असतो. तो कणा बळकट करण्यासाठी विद्यार्थ्यांचा बैधिक विकास महत्वाचा असतो. हा विकास अधिक प्रभावी व व्यापक स्वरूपात करण्याचे कार्य शाळा करत असते. 

        भेल स्कूलने उज्वल येशाची परंपरा कायम राखत या ही वर्षी 100%  निकाल  दिला आहे. 

      दहावीच्या परीक्षेत एकूण 27 विध्यार्थी प्रविष्ट झाले होते. ते सर्व विद्यार्थी घवघवीत यश मिळवून पास झाले. या वर्षी कु. सोनल सुनिल सानप हिने 96.00% मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, 95.80% मिळवून कु. श्रेया बालासाहेब मुंडे हिने द्वितीय क्रमांक मिळवला तर 95.20% मिळवत कु. वैष्णवी तुकाराम दौड हीने तृतीय क्रमांक पटकावला.

एकूण निकाल खालील प्रमाणे आहे.


90% पेक्षा जास्त 06 विध्यार्थी


80% पेक्षा जास्त 17 विध्यार्थी


70% पेक्षा जास्त 04 विध्यार्थी

  निकालाच्या या प्रसंगी श्री.वसंतरावदेशमुख (अध्यक्ष, शा.समिती) , श्री.विकासराव डुबे ( अध्यक्ष, शा. समन्वय समिती) श्री.विष्णुपंत कुलकर्णी (सदस्य) श्री.डॉ.सतिश रायते(सदस्य) , मा.श्री. दत्तापा ईटके (गुरुजी) मा. श्री जीवनराव गडगुळ (सदस्य) ,मा. श्री राजेश्वर देशमुख (सदस्य),  मा. श्री अमोल डूबे (सदस्य) , मा. श्री तुषार देशमुख (सदस्य) , सौ.शोभा भंडारी(सदस्य) श्री.एन.एस.राव (मुख्याध्यापक,सी.बी.एस.ई),श्री.पाटील परिक्षित ( मुख्याध्यापक ,स्टेट) श्री.एस.बोतकुलवार (उपमुख्यध्यापक) , तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विध्यार्थ्यांचे अभिनंदन करून पूढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!