बीड जिल्ह्यासाठी 13272 मशीन प्राप्त

 EVM व VVPAT मशीनची प्रथमस्तरीय तपासणी जिल्हा मुख्यालयात सुरु

बीड जिल्ह्यासाठी 13272 मशीन प्राप्त


बीड दि. 6 :- आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी मा. भारत निवडणूक आयोगा कडून बंगलूरू (कर्नाटक) व पंचकूला (हरियाणा) येथून EVM मशिन्स प्राप्त झाल्या आहेत. सदर मशिन्सची प्रथम स्तरीय तपासणी करण्याचे काम मा. भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार दि. 04.07.2023 पासुन सुरू करण्यात आले आहे.

जिल्हयात प्राप्त एकुण 13272 EVM-VVPAT मशिन्सची प्रथम स्तरीय तपासणी बीड मुख्यालयात वखार महामंडळ (एमआयडीसी) बीड येथिल गोदामात करण्यात येत आहे.


2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मा. आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा निवडणूक विभागाने तयारी सुरू केली आहे. एकुण 13272 EVM मशिन्सची तपासणी निर्माता कंपनी BEL चे एकुण 10 अभियंता, 10 मास्टर ट्रेनर व महसूल प्रशासनातील अधिकारी / कर्मचारी यांच्या निर्दशनाखाली करण्यात येत आहे.

सदरील तपासणीमध्ये सुरूवातीला प्रत्येक मशीनवर 96 मतदान करण्यात येवून त्यांची मोजणी व तपासणी करण्यात येणार आहे. EVM मशिनवरील नमूना मतपत्रिकेवरील 16 उमेदवारांना प्रत्येकी सहा मते दिली जातील व त्याची मतमोजणी केली जाणार आहे. त्यानंतर सर्व मशीनवर नोंदवलेले मतदान तपासले जाणार आहे.

तसेच रँडमली निवडण्यात आलेल्या 5% मशिन पैकी 1% मशीनवर 1200 मतदान, 1% मशीनवर 1000 मतदान व 500 मशिनवर 2% मतदान अशा प्रमाणात मॉकपोल घेवून मशीन्स तपासण्यात येणार आहेत. असे भा.प्र.से (दिपा मुधोळ मुंडे) जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बीड यांनी एका प्रसिद्धी पत्राद्वारे कळविले आहॆ.

-------------------------------------------------------





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार