भाविकांच्या पिकअपला बसची धडक , दोन महिला ठार 23 जण जखमी   


      

              


   नेकनूर..                   

  परभणी येथून मांढरदेवीकडे चाललेल्या पिकअपला सोलापूर महामार्गावरील उदंडवडगाव येथील शिवाजीनगर भागात जालना- पंढरपूर या बसने पाठीमागून धडक दिली या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला असून 23 जण जखमी आहेत जखमीमध्ये 11 लहान मुलांचा समावेश आहे. आरबीआय रस्ता कंपनीच्या चुकीमुळे या ठिकाणी  साइड रस्ता काढून फलक न बसविल्याने वाहने अचानक वळतात यामुळे याठिकाणी वारंवार अपघात घडत असून अनेकांना जीव गमवावा लागत आहे.         

                    परभणी येथील भाविक पिकअप एम एच 25 पी 5146 ने मांढरदेवीकडे चालले असताना रविवारी रात्री एक वाजता मांजरसुंबा येथून जवळ असलेल्या उदंड वडगावच्या शिवाजीनगर भागात पाठीमागून अंबड आगाराची बस क्रमांक एम एच06  एस 8545  ने जोराची धडक दिली यामध्ये पिकअप मधील मथुराबाई पांडुरंग गवाले वय 70 वर्ष रा. आंबेडकर नगर परभणी रंगुबाई साहेबराव जाधव वय 55 रा. पंचशील नगर ,परभणी यांचा मृत्यू झाला तर 23 जण यामध्ये जखमी असून यामध्ये 11 लहान मुलांचा समावेश आहे. या ठिकाणी बाजूला रस्ता घेताना कुठलेच दिशादर्शक फलक नसल्याने वाहने वळतात आणि पाठीमागून येणाऱ्या वाहनाची धडक बसून अपघात घडतात अनेक वेळा या ठिकाणी अपघात घडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली . पुढील तपास एपीआय विलास हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अजय पानपाटील , सचिन डीडोळ करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार