श्री वेताळ मंदिरात गुरुपौर्णिमा साजरी



परळी वैजनाथ/ प्रतिनिधी

येथील बारा ज्योतिर्लिंगाच्या नजीक असलेले श्री वेताळ मंदिर येथे आज सोमवार दिनांक 3 जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. 

आज सोमवारी श्री वेताळ मंदिर येथे गुरुपौर्णिमा निमित्त श्री विलासानंद महाराज यांच्या हस्ते गुरुप्रतिमा, पादुकांचे पूजन करण्यात आले. यावेळी महिला भजनी मंडळांनी भक्तिगीते, भजन  गायीले. गुरुपौर्णिमेनिमित्त श्री वेताळ मंदिर सुंदर व आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आले होते.   मंदिरांत  भाविकांची दिवसभर वर्दळ होती. मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आज सोमवारचा आठवडी बाजार असल्याने भाविकांनी   सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली. दुपारी महाप्रसादाने गुरुपौर्णिमा उत्साहाची सांगता झाली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !