मणिपुर राज्यातील हिंसाचाराच्या निषेधार्थ परळीत रविवारी बैठक


परळी वै ता 30 प्रतिनिधी 


मणिपुर राज्यात मागील तीन महिन्यापासुन हिंसाचार सुरू आहे. मणिपुर राज्यात सत्तेत असलेले सरकार व केंद्र सरकार यांनी हिंसाचार थांबविण्यासाठी कठोर निर्णय घेणे अपेक्षित आहे. त्यातच महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर सामुहिक आत्याचार केल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमावर प्रसारीत झाल्याने देशातील जनतेत प्रचंड संताप निर्माण झाला आहे. या हिंसाचाराच्या निषेधार्थ परळीत पुरोगामी विचारांना मानणाऱ्या विविध पक्ष व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची रविवारी ता.30 परळीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

      परळी येथील कॉंग्रेस आय च्या संपर्क कार्यालयात रविवारी दि.३० रोजी सकाळी १०:०० बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मनिपुर राज्यात चालु असलेला हिंसाचार रोखण्यात अपयशी ठरलेल्या राज्य सरकारला बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी व तेथील पिडीतांना सुरक्षा पुरवावी या मागणीसाठी परळी येथे आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी परळी येथे कॉंग्रेस आय, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उबाठा गट) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, मनसे, वंचित आघाडी, रिपाइं यासह पुरोगामी विचारांना मानणाऱ्या पक्ष व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन माकपचे कॉ पांडुरंग राठोड यांनी केले आहे.



 •••

VIDEO NEWS GALLERY 













टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !