मुख्याधिकारी साहेब काँग्रेसनी नागरी प्रश्नावर दिलेल्या निवेदनावर दुर्लक्ष करु नका-बहादुरभाई

 मुख्याधिकारी साहेब काँग्रेसनी नागरी प्रश्नावर दिलेल्या निवेदनावर दुर्लक्ष करु नका-बहादुरभाई

शहर काँग्रेसचे न.प.ला अल्टिमेटम

 

परळी प्रतिनिधी 


परळी नगर परिषदेच्या उदासीन धोरनामुळे शहरातील विविध भागात आधुरे कामे,काही भागात पाण्याची पाईप लाईन त्वरित टाका,स्वच्छता अदी नागरी प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी परळी शहर काँग्रेसच्या अनुसुचित जाती जमातीचे शहराध्यक्ष दिपक सिरसाट यांनी आज शहराध्यक्ष बहादुरभाई यांच्या नेतृत्वाखाली परळी नगर प्रशासनाला निवेदन दिले आहे.


नगर परिषदेला दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे कि, मागील एक वर्षाचा कालावधी पूर्ण होवून सुध्दा उखळवेस पांदन रोड वेताळ मार्गाचे प्रलंबीत काम रखडले आहे. त्यामुळे या भागातील नागरीकांना रस्त्यावरील खडयामुळे  अँटो, मोटार सायकल स्लिप होण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे छोटेमोठे अपघात होत आहेत. हा रस्ता व नाली मंजूर होवून एकवर्ष होऊन गेले आहे सुध्दा खुपच मंद गतीने रस्त्याचे काम चालू असून हे काम जलद गतीने पुर्ण करावे, भिमनगर / साठेनगर रोडे गल्ली प्रभागात पाण्याची टाकी अस्तिवात आहे परंतु गल्लीमध्ये पाण्याची पाईप लाईन टाकुन नळाचे कनेक्शन नाही ते त्वरित द्यावेत, रस्त्या नाली की, नालीवर रस्ता असे झाल्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासर्व मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत अन्यथा या अधु-या कामाचे फोटोची बँनरबाजी करत शहरभर मिरविण्यात येणार असुन न.प.कार्यालया समोर शहराध्यक्ष बहादुरभाई यांच्या नेतृत्वाखाली अमरण उपोषण करण्याचा ईशारा अनु. जाती विभागचे शहराध्यक्ष दिपक सिरसाठ यांनी दिला आहे.

या निवेदनावर कार्याध्यक्ष शशी चौधरी विधानसभा अध्यक्ष रंजीत देशमुख उपाध्यक्ष खतीब सर ओबीसीचे अध्यक्ष जावेद भाई अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष रसूल खान शेख बाबू अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार