भेल संस्कार केंद्रात पारंपारिक पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी




 परळी वै (प्रतिनिधी) :

                       येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई, संचलित भेल संस्कार केंद्रात पारंपारिक पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी केली. सोप्या, साध्या व पारंपारिक पद्धतीने म्हणजेच आपली परंपरा जपत गुरुपौर्णिमा साजरी केली आणि गुरूंना गुरुदक्षिणा दिली. परंपरागत असलेला हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित केला होता.

        याप्रसंगी सर्वप्रथम संकुलाचे मुख्याध्यापक श्री.एन.एस. राव सर यांनी महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून गुरुपौर्णिमेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. त्याबरोबरच आजच्या या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे संकुलातील माजी विद्यार्थी यांनी सदिच्छा भेट देण्याचा  आजचाच मंगलमय दिवस नियुक्त करून संकुलामध्ये आपली उपस्थिती दर्शवली. त्यांनी शिक्षकांबद्दल आणि त्यांच्या आयुष्यातील गुरु विषयी मत मांडून त्यांचे आभार मानले. गुरु म्हणून मिळालेले शिक्षक कसे आहेत हे अगदी हुबेहूब शब्दात मांडले. एखादी चांगली कामगिरी केल्यावर लाडाने पाठ थोपटणारे तर चुकल्यावर कान पकडणारे गुरु आम्हाला या भेल संस्कार केंद्रात मिळाले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. असेही गौरवोद्गार काढले , तसेच आपल्याला प्रत्येक क्षेत्रात गुरु हा प्रत्येक पायरीला मिळत असतो त्याला समजणे आपले काम आहे. त्यांचा आपण आदर केला पाहिजे. त्यांनी सांगितलेल्या पदपथावर चालून आपण आपल्या जीवनाचा उत्कर्ष करून घेतला पाहिजे. त्यांचे हे विचार आपल्याला भावी जीवनात वेळोवेळी कामी पडत असतात, म्हणून म्हणावेसे वाटते की,.............    *गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु, गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात परब्रम्ह, तस्मै श्री गुरुवे नमः*।। 

           याप्रसंगी संकुलातील विद्यार्थ्यांनी आपापल्या गुरु विषयी महत्त्व पटवून देताना आपले मनोगत व्यक्त केले .पुनश्च एकदा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

      या कार्यक्रमासाठी संकुलाचे मुख्याध्यापक श्री.एन.एस. राव सर उपमुख्याध्यापक श्री. सुनील बोटकुलवार सर, सर्व विभाग प्रमुख शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची विशेष उपस्थिती होती.तसेच विद्यार्थ्यांसहित पालकांचाही उदंड प्रतिसाद मिळाला.  शाळेच्या परिपाठानंतर राष्ट्रगीत घेऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख श्री. पाटील पी .व्ही व श्री. प्रफुल्ल कांबळे सर यांनी प्रसिद्धी माध्यमास दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !