ऐतिहासिक विशेष रेल्वेने रामकथा व ज्योतिर्लिंग यात्रा

 संत मोरारी बापुंची २२ जुलै पासून बारा ज्योतिर्लिंग यात्रा: परळी वैजनाथ मात्र यात्रेतून वगळले


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
       प्रसिद्ध रामकथा प्रवक्ते संत मोरारी बापू हे दिनांक 22 जुलै पासून १८ दिवसांच्या  ऐतिहासिक अशा बारा ज्योतिर्लिंग यात्रेवर निघणार आहेत. आपल्या हजारो अनुयायांसह दोन  विशेष रेल्वेने 18 दिवसांची ही यात्रा  करणार आहेत. बारा ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी काही वेळ थांबून ते कथाही करणार आहेत. त्यांच्या या बारा ज्योतिर्लिंग यात्रेमध्ये महाराष्ट्रातील चार ज्योतिर्लिंगांचा समावेश करण्यात आलेला आहे परंतु यातून परळी वैजनाथ वगळण्यात आलेले आहे.
       आद्य शंकराचार्यांनी ज्या ज्या ठिकाणी ज्योतिर्लिंग यात्रा केली त्या सर्व ठिकाणी आपली यात्रा जाणार असल्याचे मोरारी बापू यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे 'एक भारत'  व 'एक भारत संवादसेतू' अशी या यात्रेची संकल्पना आहे परंतु या यात्रेच्या ज्योतिर्लिंग यादी मधून परळी वैजनाथ वगळण्यात आले आहे.त्याऐवजी झारखंड येथील वैद्यनाथधामला ही यात्रा जाणार आहे. महाराष्ट्रात ही यात्रा औंढा नागनाथ, घृष्णेश्वर ,भीमाशंकर व त्र्यंबकेश्वर या ठिकाणी येणार आहे.

असे आहे यात्रेचे वेळापत्रक

22 जुलै 2023, केदारनाथ, उत्तराखंड

24 जुलै 2023, विश्वनाथ ज्योतिर्लिंग, उत्तर प्रदेश

25 जुलै 2023, बैद्यनाथ ज्योतिर्लिंग, झारखंड

26जुलै  2023, जगन्नाथ पुरी, ओडिशा

27जुलै  2023 मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग, आंध्र प्रदेश

28 जुलै आणि 29 जुलै  2023, रामेश्वरम ज्योतिर्लिंग, तमिलनाडु

30 जुलै   2023, तिरूपति बालाजी मंदिर, आंध्र प्रदेश

31  जुलै 2023, नागेश्वर ज्योतिर्लिंग, महाराष्ट्र

1 ऑगस्ट  2023, भीमाशंकर ज्योतिर्लिंग, महाराष्ट्र

2 ऑगस्ट 2023, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, महाराष्ट्र

3 ऑगस्ट  2023, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, महाराष्ट्र

4 अगस्त 2023, ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग, मध्य प्रदेश

5ऑगस्ट   2023, महाकालेश्वर ज्योतिर्लिंग, मध्य प्रदेश

6ऑगस्ट   2023, द्वारकाधीश मंदिर, द्वारका

6ऑगस्ट  2023, नागेश्वर ज्योतिर्लिंग, गुजरात

7 अगस्त 2023, सोमनाथ ज्योतिर्लिंग, गुजरात

8 ऑगस्ट  2023, तलगाजार्डा (बापू गांव), गुजरात

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार