सर्वांगीण उन्नतीचा मार्ग दाखवितो तोच खरा गुरू :-प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे



परळी वैजनाथ....

येथील सनराईज इंग्लिश स्कुल मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न झाली.जो सर्वांगीण उन्नतीचा मार्ग दाखवितो तोच खरा गुरू असे प्रतिपादन प्रख्यात सिने-नाटय अभिनेता-दिग्दर्शक रंगकर्मी  प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांनी व्यक्त केले.पुढे बोलतांना ते म्हणाले की,विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक, नैतिक, बौद्धिक, शारिरीक, सामाजिक कौशल्यांची सर्वसमावेशक पेरणी करून त्यांचा संतुलित व  सर्वांगीण विकास साधणे ही शिक्षकांची मुख्य जबाबदारी आहे.मुलांचे मातीशी असलेले नाते, सामाजिक बांधिलकी, कौटुंबिक जिव्हाळा, संस्कार यांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. शिक्षण पूर्ण करणाऱ्या मुलात तो राहत असलेल्या प्रदेशाची, पर्यावरणाची जाणीव निर्माण होईल. राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय जबाबदारीचे भान निर्माण होईल. मानवजातीला भेडसावणाऱ्या समस्या व आपल्या आव्हाने ओळखून त्याचा सामना करण्यासाठी तो समर्थ होईल.असा सक्षम विद्यार्थी व सुजाण नागरिक सनराईज इंग्लिश स्कुल मधून घडेल असा विश्वास प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांनी या प्रसंगी व्यक्त केला.

गुरुपौर्णिमा सोहळ्यात गुरुजनांचा मनोभावे सत्कार करण्यात आला.भाषण, नृत्य, विविध रंगी वेशभूषा आदी विविध उपक्रमांनी गुरू पौर्णिमा उत्साहात संपन्न झाली.

हा सोहळा सनराईज इंग्लिश स्कुलचे संचालक गोविंदराव मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. विचारमंचावर संस्था सचिव सौ. प्रियतमा मुंडे यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी आपल्या मनोगतात गुरूंची महिमा कथन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सनराईज इंग्लिश स्कुलचे उपक्रमशील प्राचार्य ए. एस. रॉय यांनी गुरुपौर्णिमेचे महत्व विशद केले. गुरुपौर्णिमा सोहळा यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष योगदान दिले.विद्यार्थी आणि पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार