पंकजा मुंडेंच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडणारा पत्रकार प्रा.रविंद्र जोशी यांचा विशेष ब्लॉग >>> मनस्विनी......!

 ▪️ मनस्विनी......!


 र्तबगार-कर्तृत्ववान स्त्रियांच्या व्यक्तीमत्वाचा परिचय अस्सल शब्दश: अर्थाने करुन घेतांना विविध साहित्यिक साधनांचा विशेषत: विशेषणांचा धांडोळा घेतला तर त्याचे परिमाण देणारा शब्द म्हणजे मनस्विनी............


     राजवैभव पायाशी लोटांगण घालत असतानासुद्धा नियतीने  जीवनात अनेक खडतर प्रसंग उभे केले. या प्रसंगांच्या वेळची  सोशिकता, सहनशीलता, प्रसंगावधान आणि नियतीवर मात करण्याची जबरदस्त जिद्द व महत्त्वाकांक्षा ज्यांच्या जीवन वाटचालीतून पाहावयास मिळते. स्वाभिमानी कारकीर्द आणि घेतलेला वसा आणि वारसा याच्या  संरक्षण-संवर्धनासाठी केलेली धडपड ,संघर्ष ज्यांच्या जीवन वाटचालीतून पाहावयास मिळते. याचा परामर्श घेतला तर आजच्या घडीला महाराष्ट्रात पंकजाताई मुंडे यांचं व्यक्तिमत्त्वच ठरते....मनस्विनी.


             मनस्विनी हे विशेषण चपखल लागु होणारं व्यक्तिमत्व म्हणजे पंकजाताई मुंडे. आता तुम्ही म्हणाल मनस्विनी म्हणजे काय? तर मनस्विनी म्हणजे अनेक वैविध्यपूर्ण अर्थांचे विशेषण सामावणारा एक शब्द.पंकजाताईच्या  व्यक्तीमत्वाला साजेसं,अनुरूप नव्हे तर सर्वच अर्थ तोलून बघितले तर तंतोतंत जुळणारे पैलू. 


        मनस्विनीचा पहिला अर्थ बघितला तर तो होतो स्वाभिमानी. या अर्थाने पंकजाताईच्या  व्यक्तीमत्वाला व वाटचालीला बघितले तर जास्त सांगण्याची गरज नाहीच. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे नेहमीच म्हणायचे, " मी तुम्हाला काय दिले, नाही दिले,देवू शकेन अथवा देवू शकणार नाही मात्र तुम्हाला मी काय देणार तर स्वाभिमान आणि तो दिलाही.आजही प्रत्येकातील ही स्वाभिमानाची निव पक्की झालेली अनेक प्रसंगात वेळोवेळी दिसलेलीच आहे.पंकजाताईंचा हाच बाणा लाखो समर्थकांना हवाहवासा वाटतो.राजकीय जीवनात लक्षावधींचे नेतृत्त्व करतांना स्वाभिमानी नेतृत्वाची झळाळी तळपतेच म्हणुन तर या अर्थाने पंकजाताई मनस्विनी ठरतात. 

          

        मनस्विनीचा दुसरा अर्थ होतो स्व-नियंत्रित. राजकारण ,समाजकारण करतांना अनेकजण अनेक प्रकारे बोलतात. अनेक चर्चा, सुचना,सल्ले प्रसंगी उपदेश देत असतात. पंकजाताईंच्या राजकीय वाटचालीत या बाबी असंख्य वेळी येतात. मासलिडर असल्याने त्यांच्याकडे येणाऱ्या 'कमेंट' ओपिनियन याचं प्रमाणही 'मास ओपिनियन ' या प्रकारातीलच असते. अशावेळी 'सेल्फ कंट्रोल्ड डिसिजन' याला अत्यंत महत्त्व आहे. कोणताही प्रभाव न पडता 'स्व-नियंत्रित' असणे आणि त्याप्रमाणे पुढचं पाऊल टाकले ही खरं तर सोपी गोष्ट नाहीच पण असंख्य प्रसंगात पंकजाताईंचे निर्णय किंवा भुमिका चर्चांनी किंवा कोण काय म्हणतो,कोणाला काय वाटते यापेक्षाही 'स्व-नियंत्रित' वाटतात. या अर्थाने विचार केला तरी पंकजाताई मनस्विनी ठरतात. 


         मनस्विनी शब्दाचे आणखी अर्थ होतात चाणाक्ष, बुद्धिमान, समझदार या अर्थाने तर फार विचार करण्याचीच गरज नाही.चाणाक्ष, बुद्धिमान, समझदार  हे गुण असल्याशिवाय कोणतीच व्यक्ती पुढे जाऊ शकणार नाही. त्यातही राजकारणासारख्या सर्वव्यापक क्षेत्रात तर प्रवेशच करु शकणार नाही.त्याहीपेक्षा लोकोत्तर लोकनेता असलेल्या दिवंगत लोकनेत्याचा वसा अन् वारसा पुढे घेऊन जाताना ही सोपी गोष्ट नाहीच. तो वसा अन् वारसा त्याच तोलामोलाने समर्थपणे पुढे घेऊन जाणाऱ्या पंकजाताई खऱ्या अर्थाने मनस्विनीच ठरतात. 



          देवीभागवतात देवीची सहस्र नामावली आलेली आहे. यामध्ये मनस्विनी हे दुर्गादेवीचेही नाव आहे. दुर्गादेवीचे वर्णन 'मातृरुपेन' ,'शक्तीरुपेन''बुद्धिरुपेन' 'शांतीरुपेन', 'श्रद्धारुपेन' 'लक्ष्मीरुपेन',  अशा वेगवेगळ्या प्रकारे आलेले आहे.याचा एकत्रित अर्थ 'शिवे सर्वार्थ साधिके' असा आहे. म्हणजेच सर्वांचे सर्व प्रकारचे सर्वार्थाने 'मंगल' प्रदान करणारी  नारायणी असे वर्णन केले जाते. हीच दुर्गा दुष्ट शक्तींवर मात करण्यासाठी 'महिषासुरमर्दिनी' होते. मनस्विनीचा पौराणिक अर्थही याच गुणवैशिष्ट्यांनी भरलेला आहे.


         स्वाभिमानी,स्व-नियंत्रित , लाखोंच्या मनोविश्वाच्या झोपाळ्यावर त्यांच्या सुखासाठी आणि कल्याणासाठी झोके घेणारी, तळागाळातील वंचित,उपेक्षितांची वाणी होवून प्रत्येकाच्या उन्नत,उदात्त आणि समृद्धीचे स्वप्न पाहणारी 'मनस्विनी', स्वतःच्या मनाला ओळखत उंच भरारी घेऊन स्वतःचा शोध घेऊ पाहणारी मनस्विनी म्हणजे पंकजाताई मुंडे. त्यांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने या मनस्विनी व्यक्तिमत्त्वाला मनस्वी लक्ष लक्ष शुभेच्छां !!!!


     @ ✍️ प्रा.रविंद्र जोशी, 

          पत्रकार परळी वैजनाथ.

------------------------------------------------------


•••




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !