परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

संवेदनशील व अभिनव संकल्पना :कौतुकास्पद

 मायेच्या धाग्याने रुग्ण भारावले: रुग्णालयातील रुग्णांना धोंडे जेवण व केला पूर्ण आहेर

परळीच्या सौ.कीर्ती किरण धोंड यांचा संभाजीनगर येथे उपक्रम


परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

          कुटुंब आणि नातेवाईकांसोबत आपण नेहमीच सण उत्सव असे आनंदाचे प्रसंग साजरे करत असतो. सध्या अधिकमास सुरू आहे. या निमित्ताने ठिकठिकाणी धोंडे जेवणाची लगबग सुरू आहे. लेक- जावयांना व पै पाहुण्यांना धोंडे जेवण देणे सध्या सुरू आहे. परंतु या सर्व गोष्टीला फाटा देत परळीच्या सौ. कीर्ती किरण धोंड यांनी आगळावेगळा उपक्रम राबविला असून संभाजीनगर (औरंगाबाद) येथील शासकीय कर्करोग रुग्णालयातील रुग्णांसोबत धोंडे जेवण व रुग्णांना पूर्ण आहार करत त्यांनी अधिक मास साजरा केला आहे. त्यांच्या या मायेच्या धाग्याने रुग्णालयातील रुग्ण भारावून गेले.

            शासकी कर्करोग रुग्णालय औरंगाबाद येथे रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या उपचार घेणाऱ्या रुग्णांना अधिक महिन्यातील आनंदापासून वंचित राहायला लागू नये यासाठी म्हणून परळीच्या सौ कीर्ती किरण धोंड यांनी येथील वैद्यकीय अधिष्ठाता यांची परवानगी घेत रुग्णालयात दाखल असलेल्या सर्व रुग्णांना धोंडे जेवण आयोजित केले. एवढेच नाही तर धोंडे जेवणानंतर आपण ज्याप्रमाणे आपल्या नातेवाईकांना आहेर करतो. त्याप्रमाणे संपूर्ण रुग्णांना पूर्ण आहेरही त्यांनी भेट दिला. अशा आगळ्यावेगळ्या या प्रसंगाने रुग्णालयातील रुग्ण भारवून गेले. यावेळी कॅन्सर हॉस्पिटल चे अधिष्ठाता डॉ. गायकवाड व सर्व स्टाफ उपस्थित होता.

•••







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!