गोंधळून जाण्याचं किंवा काळजीचं कोणतंही कारण नाही.

 आज सकाळी असंख्य स्मार्टफोन का वाजले? दूरसंचार मंत्रालयाकडून इमर्जन्सी अलर्ट टेस्टिंग? वाचा नेमकं काय घडलं…



पुणे: विविध प्रकारच्या जाहिरातींचे लघुसंदेश मोबाईल फोनवर येत असतात. मात्र आज सकाळी १०.२० ते १०.३० दरम्यान आज असंख्य स्मार्टफोन ‘व्हायब्रेट’ होऊन त्यावर एक संदेश दिसला. त्यामुळे एकाएकी असे का झाले, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याबाबत अनेकांनी समाजमाध्यमांत पोस्ट करून प्रश्न विचारले आहेत. मात्र केंद्रीय तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ही तातडीची चाचणी केली जात असल्याची चर्चा आहे.
तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना जागरूक करणे शक्य आहे. त्यामुळे सरकारकडून अनेकदा नैसर्गिक आपत्तीविषयी लघुसंदेश पाठवून सूचना दिली जाते. मात्र सर्व नागरिक ते संदेश गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे एकाचवेळी अनेकांना असे इमर्जन्सी अलर्ट पाठवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.या अनुषंगाने शोध घेतला असता, काही महिन्यांपूर्वी २३ एप्रिल रोजी युनायटेड किंग्डमनेही अशा प्रकारे इमर्जन्सी अलर्टची चाचणी घेतल्याचे निदर्शनास आले.
तुमच्याही मोबाईलवर असा अलर्ट आला असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. सध्या कोणताही धोका आलेला नसून, ही केवळ एक चाचणी होती.केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने हा अलर्ट जारी केला होता. या माध्यमातून आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये, किंवा मोठ्या संकटावेळी देशातील सर्व नागरिकांना एकाच वेळी सूचना देण्याच्या यंत्रणेची चाचणी घेण्यात आली. यामुळे भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व नागरिकांना वेळेत अलर्ट मिळणार आहे.मराठीमध्येही आलं नोटिफिकेशनसकाळी १०.२० वाजता इंग्रजीमध्ये सर्वांना एक इमर्जन्सी अलर्ट मिळाला. त्यानंतर काही वेळाने, १०.३१ वाजता मराठीमध्ये देखील पुन्हा एकदा असा अलर्ट मिळाला. सध्याचा अलर्ट हा केवळ चाचणी म्हणून होता, त्यामुळे गोंधळून जाण्याचं किंवा काळजीचं कोणतंही कारण नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !