संतसंगतीने जीवनाला वेगळीच दिशा : हभप नारायण महाराज बारटक्के

 संतसंगतीने जीवनाला वेगळीच दिशा : हभप नारायण महाराज बारटक्के



श्री संत नामदेव महाराज समाधी सोहळ्यास परळीत उत्साहात सुरुवात


परळी वैजनाथ/प्रतिनिधी


समस्त प्राणिमात्रांचे कल्याण श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यामध्ये सांगितले आहे . ज्ञानेश्वरी ग्रंथात सांगितलेल्या ज्ञानाचा आत्मसात केल्यास मनुष्याच्या जीवनात सुख , शांती व समृद्धी लाभणार आहे . तर संतसंगतीने जीवनाला वेगळीच दिशा मिळते , असे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.श्री नारायण महाराज बारटक्के यांनी केले . 


श्री संत शिरोमणी नामदेव महाराज समाधी सोहळा निमित्त परळी वैजनाथ येथे कृष्णा नगर भागात श्री संत नामदेव महाराज मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून ज्ञानेश्वरी पारायण व व्यासपीठ प्रमुख ह भ प श्री नारायण महाराज बारटक्के हे आहेत. दररोज पहाटे चार ते सहा काकडा, सात ते अकरा श्री ज्ञानेश्वरी पारायण, दहा ते बारा गाथा भजन, दुपारी दोन ते चार श्री संत नामदेव चरित्र, चार ते सहा महिला भजनी मंडळ व धुपारती, रात्री आठ ते दहा हरीजागर असे विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत.दिनांक 9 जुलै पासून सुरू असून  दिनांक 15 जुलै रोजी  श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता होणार सकाळी दहा ते बारा वाजता गीता भक्त ह भ प श्री संपत महाराज गीते यांचे कीर्तन होणार असून त्यानंतर पालखी मिरवणूक व सार्वजनिक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच 16 जुलै रोजी सकाळी 11 ते 1 वाजता ह भ प श्री ह भ प श्री नारायण महाराज बारटक्के यांचे काल्याचे किर्तन होणार आहे तसेच 17 जुलै सोमवार रोजी प्रक्षाळ पूजा होईल व श्री संत नामदेव महाराज महिला भजनी मंडळाचे भजन होणार आहे.

परळी शहर व पंचक्रोशीतील भावी भक्तांनी या धार्मिक कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत नामदेव महाराज शिंपी समाज,  श्री संत नामदेव महाराज महिला मंडळ, श्री संत नामदेव महाराज युवक मंडळ परळी वैजनाथ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !