राष्ट्रसंत भगवान बाबांनी कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली-उपप्राचार्य प्रा.हरिष मुंडे


  परळी ,प्रतिनिधी..  येथील वैद्यनाथ कॉलेजमध्ये राष्ट्रसंत भगवान बाबा यांची 127 वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. हरीश मुंडे यांनी राष्ट्र संत भगवान बाबा यांनी समाजामध्ये असलेली अंधश्रद्धा -रूढी -परंपरा व जातीयता नष्ट करण्यासाठी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन घडून आणले असे मत याप्रसंगी त्यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर संत भगवान बाबांचे कार्य समाज उपयोगी होते त्यांचे विचार प्रेरणादायी असल्यामुळे आज त्यांच्या विचारांची आवश्यकता आहे असेही सांगितले. बाबांनी सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी त्यांनी लोक कल्याणकारी कामे केली. त्यासाठी संपूर्ण आयुष्यभर खडतर जीवन प्रवास केला. या कार्यक्रमाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्या परिषद सदस्य, डॉ. पी एल कराड, डॉ विनोद गायकवाड, श्री मनोहर कराड, प्रा. समीर रेणूकादास, प्रा.उत्तम कांदे ,डॉ तुकाराम गित्ते, डॉ रामेश्वर चाटे, डॉ.बाबासाहेब शेप, डॉ व्यंकट मुंडे,प्रा अरूण ढाकणे, प्रा रवी कराड, प्रा मनोज फड, यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ बाबासाहेब शेप व आभार डॉ रामेश्वर चाटे यांनी मानले.

 •••

VIDEO NEWS GALLERY 













टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !