बीडच्या एलसीबीची अंबाजोगाई तालुक्यात कारवाई

 पाठलाग करून चारचाकी वाहनासह गावठी पिस्टल, शस्त्रसाठा, दारू जप्त


बीडच्या एलसीबीची अंबाजोगाई तालुक्यात कारवाई


अंबाजोगाई (प्रतिनिधी)- बीडच्या एलसीबीच्या पोलिस निरिक्षक पदाचा पदभार स्विकारताच पोलिस निरिक्षक संतोष साबळे यांनी धडाकेबाज कारवाया सुरु केल्या आहेत. अंबाजोगाई तालुक्यातील पुसमध्ये गावठी दारूअड्यावर पिस्टलसह धारधारशस्त्रसह तिघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात यश आले असून एक जण फरार झाला आहे. त्यांच्याकडून पिस्टल, तलवारी, कत्त्या व अवैध दारू 2 लाख 85 हजाराची मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी बर्दापुर पोलिस ठाण्यात चारही आरोपी विरोधात आर्मअ‍ॅक्टसह बर्दापुर पोलिसात इतर इत्यार अनाधिकृत बाळगल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा  नोंद झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक चोपने करीत आहेत.

अंबाजोगाई तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्रीचे धंदे सुरू असून धाब्यासह घरगुती ठिकाणी खुलेआम गावठी दारूसह विदेशी दारूचा धंदा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथील सचिन विश्‍वनाथ उदार यांच्या गावठी दारूच्या दुकानावर हत्याराचा धाक दाखवून दारू विक्री केली जाते याची माहिती बीडच्या एलसीबीला मिळाल्यानंतर त्यांच्या पथकाने सकाळी 8 वाजता पुस गाव गाठले. आणि त्या ठिकाणी देशी,विदेशी सह दारू विक्री करताना तिघा जणांना रंगेहात पकडले. तर एक जण फरार झाला आहे.

आज सकाळी पोलिसांनी छापा मारला तेंव्हा आरोपी पळून जात असतांना त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करून पोलिसांनी त्यांच्याकडून चारचाकीसह गावठी पिस्टल, मोठा घातक शस्त्रसाठा जप्त केला. यावेळी देशी-विदेशी दारूही पोलिसांना मिळून आली या प्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर बर्दापुर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीला पोलिसांनी विश्‍वासात घेवून विचारले असता त्याने घरामध्ये ठेवलेला गावठी कट्टा पोलिसांच्या स्वाधीन केला. घराची आणखी कसून तपासणी केली असता एक तलवार, चाकू, कत्ती सारखे घातक शस्त्र मिळून आले. अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथील बंडु ऊर्फ बंटी विश्वनाथ उदार हा व्यक्ती गावठी कट्टा बाळगत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख संतोष साबळे यांना मिळाली होती. त्यांनी आपल्या फौजफाट्या बुधवार, दि. 12 जुलै रोजी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पुस गाव गाठले गावात पोलीस आल्याचे पाहून बंडु ऊर्फ बंटी पळु लागला त्यावेळी पोलिसांनी पाठलाग करत त्याच्या मुसक्या आवळल्या. गावठी कट्ट्या बाबत विचारणा केली. असता घरामधील तलवार, चाकु, कत्ती सारखे धारधार शस्त्र आढळून आले. ते पोलिसांनी जप्त केले. एक चारचाकी गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी एलसीबीचे मारूती कांबळे यांच्या फिर्यादीवरून गुरनं99/23 कलम 2,4,/25 भारतीय हत्यार कायदा (आर्मअ‍ॅट) व सह कलम 65 ई बारूबंदी कायदा अंतर्गत बंडु उर्फ बंटी विश्वनाथ उदार, राजु उर्फ स्वप्रिल विश्वनाथ उदार, सचिन विश्वनाथ उदार सर्व पुस ता.अंबाजोगाई, जि.बीड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून 2 लाख 85 हजाराचा मद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तर संतोष विश्‍वनाथ उदार हा पोलिसांना चकवा देत पळुन जाण्यात यशस्वी झाला.

सदरील कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरिक्षक संतोष साबळे, पोउपनि श्रीराम खटावकर, सहाय्यक फौजदार तुळशीराम जगताप, पो.को. रामदास  तांदळे, बाळकृष्ण जायभाये, विकास राठोड, सुशिला हजारे, स्वाती मुंडे, भागवत शेलारे, राजु पठाण, अर्जुन यादव, बिभिषण चव्हाण व वाहन चालक अतुल हराळे यांनी केली. या छापेमारीमध्ये सहकार्य केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !