प्रसिद्ध वक्ते बालाजी जाधव यांचे होणार मार्गदर्शन

 राधा मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने दोन दिवसीय मोफत वक्तृत्व कला विकास शिबिराचे आयोजन 

प्रसिद्ध वक्ते बालाजी जाधव यांचे होणार मार्गदर्शन

परळी / प्रतिनिधी

राधा मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने परळी वैजनाथ येथे दिनांक 17 व 18 जुलै रोजी मोफत वकृत्व कला विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध वक्ते तथा लेखक बालाजी जाधव हे शिबिरात भाषण कलेचे मार्गदर्शन करणार आहेत . विद्यार्थी तसेच राजकीय पक्ष व विविध संघटना पदाधिकाऱ्यांना या शिबिरातून उत्तम भाषण कला अवगत करता येणार असून याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी केले आहे.

भाषण ही एक कला असून आपल्या भाषण शैलीतून अनेकांनी भव्य दिव्य व्यासपीठ गाजविले आहेत . आपल्या भाषणातून असेच व्यासपीठ गाजवले जावे अशी सर्वांची अपेक्षा असते परंतु भाषण कसे करावे , भाषणासाठी मुद्दे कसे निवडावेत , सभेत बोलताना आपले हावभाव कसे असावेत या सोबतच असे अनेक प्रश्न सर्वांनाच पडतात . या पार्श्वभूमीवर राधा मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने परळी येथे 17 व 18 जुलै रोजी दोन दिवसीय वकृत्व कला विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . हे शिबिर मोफत असून सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत दोन दिवस चालेल . या शिबिरात प्रसिद्ध वक्ते आणि ज्यांच्या माध्यमातून हजारो वक्ते निर्माण झाले आहे असे मार्गदर्शक बालाजी जाधव हे शिबिरातील सहभागींना भाषण कसे करावे हे शिकविणार आहेत . भाषण संदर्भातील विविध 30 विषयांवर ते मार्गदर्शन करणार असून काही भाषणांचे प्रात्यक्षिकही दाखविले जाणार आहेत . पुणे येथे बालाजी जाधव यांचे भाषण कले संदर्भात क्लासेस चालू असतात . युट्युब वर ही त्यांच्या भाषणाचे अनेक व्हिडिओ लोकप्रिय आहेत.

मोफत वकृत्व कला विकास शिबिरासाठी नाव नोंदणी आवश्यक असून याकरिता मराठवाडा साथी कार्यालयात तसेच ओम प्रकाश बुरांडे, प्रशांत जोशी ,प्रकाश वर्मा ,आनंद हडबे, राजेश मोदानी,आनंद तूपसमुद्रे , यांच्याकडे नाव नोंदणी करता येईल. परळीकरांसाठी ही एक उत्तम संधी असून आपल्या भाषण कलेतून आपले व्यक्तिमत्व जगासमोर आणण्याची एक चांगली संधी या माध्यमातून मिळणार आहे. परळी शहर व परिसरातील विद्यार्थी राजकीय पक्षाचे पदाधिकारी आदींनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !