अधिक मासानिमित्त विश्व शांती व लोक कल्याणार्थ

 अधिक मासानिमित्त विश्व शांती व लोक कल्याणार्थ

परळी वैद्यनाथ येथे पंचकुंडात्मक हरिहर याग व शिव महापुराण कथेचे आयोजन, यज्ञशाळा व मंडप उभारणीस वेग 


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

       पुरूषोत्तम मास (अधिक मास) पर्वकाळ निमित्ताने विश्व शांती तथा लोक कल्याणार्थ येथील श्री सुर्वेश्वर प्रभूंच्या सानिध्यात दिनांक 26 जुलै 2023 ते 1 ऑगस्ट 2023 पर्यंत सकाळी 8 ते 12 या वेळेत पं. विजयजी पाठक यांच्या आचार्यत्वात पंचकुंडात्मक हरिहर याग व दुपारी 2 ते 6 या वेळेत पं. उत्तमजी शास्त्री यांच्या रसाळ वाणीतून शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्यदिव्य धार्मिक कार्यासाठी विधिवत यज्ञशाळा व वॉटरप्रूफ कथामंडप उभारणीच्या कामास वेग आला असून यज्ञशाळा निर्माण कार्य अंतिम टप्प्यात आले असल्याचे संयोजकांनी सांगितले आहे.


परळी वैजनाथ तीर्थक्षेत्रातील भाविकांना शिव महापुराण कथा आणि पंचकुंडात्मक हरिहर यागाचा लाभ व्हावा यासाठी श्री सुर्वेश्वर मंदिर विकास समितीच्या वतीने प्रयत्न केले जात असून जास्तीत जास्त संख्येने भाविक भक्तांनी या पर्वणीचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री सुर्वेश्वर मंदिर विकास समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


भव्य शोभा यात्रा निघणार

       दरम्यान पंचकुंडात्मक हरिहर याग व शिव महापुराण कथेच्या शुभारंभ प्रसंगी भव्य शोभा यात्रा काढण्यात येणार आहे. दि. 26 जुलै 2023 रोजी सकाळी 10 वाजता मोंढा विभागातील हनुमान मंदिर येथून शोभा यात्रा सुरू होऊन मोंढा, राणी लक्ष्मीबाई टाॅवर, जिजामाता उद्यान मार्गे सुर्वेश्वर मंदिर येथील कथास्थळी येणार आहे. यात महिला - पुरूषांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !