१३ तारीख १३ तास 'नाॅनस्टाॅप ग्रॅण्ड वेलकम'

 अभुतपूर्वच: १३ तारीख १३ तास 'नाॅनस्टाॅप स्वागत ; धंनजय मुंडे नावाचे 'गारुड' !


परळी वैजनाथ, प्रा.रविंद्र जोशी......
        परळीत पडत्या पावसात हजारोंचा जनसागर, सबंध जिल्ह्यात धनंजय मुंडेंच्या स्वागताचे 'महाकाय' शक्तिप्रदर्शन, नगरपासून परळीपर्यंत धनंजय मुंडेंचे अखंडित जोरदार स्वागत, तोच उत्साह ,तोच जल्लोष आणि अख्खा दिवस प्रत्येकजण त्यांच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेला. योगायोगही तसाच.१३ तारीख १३ तास 'नाॅनस्टाॅप स्वागत.काय म्हणायचे याला ? लोकाभिमुख, लोकमान्य नेतृत्वाचा 'करिष्मा' काय तो हाच. याला अभुतपूर्व नाहीतर काय म्हणणार? हेच आहे धंनजय मुंडे नावाचे 'गारुड'. धनंजय मुंडेंचे नगरपासून परळीपर्यंत झालेले स्वागत पहाता हे 'अभुतपूर्वच!' हेच म्हणावे लागेल.
              धंनजय मुंडे यांनी राज्याच्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जेंव्हा कॅबीनेट मंत्रीपदाची शपथ घेतली तेंव्हाच बीड जिल्हयाच्या वाट्याला जवळपास एक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर मंत्रीपद आले.बीड जिल्ह्यातील जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या. बीड जिल्ह्यालाच्या वाट्याला गेल्या वर्षापासून मंत्रीपदच काय पालकमंत्रीही बाहेर जिल्हयाचा होता . बीड जिल्ह्याच्या  राजकारणात असे अनेक वर्षानंतर घडले होते.आता धंनजय मुंडे हे मंत्री झाल्याने बीड जिल्हयातील प्रत्येकाच्या मनात आपले प्रश्न मार्गी लागतील हा विश्वास निर्माण झाला आहे.मंत्रीपदाची शपथ घेतल्यांनतर धनंजय मुंडे प्रथमच बीड जिल्ह्यात आले. हा प्रसंग आनंदाचाच.त्यामुळेच अगदी बीड जिल्ह्याची हद्द ज्या ठिकाणाहुन सुरू होते त्या आष्टी तालुक्यातील  धानोरा गावापासून  जोरदार स्वागताला सुरूवात झाली. जेसीबीने  पुष्पवृष्टी, सत्कार सोहळे सुरूच होते. कडा,आष्टी, जामखेड, पाटोदा, मांजरसुंबा, बीड शहर, वडवणी, तेलगाव, धारूर ,केज, अंबाजोगाई आणि शेवटी परळी पर्यंत ज्या उत्साहात स्वागत होत होते ते  अभुतपूर्वच होते. आपल्या जिल्हयाच्या मातीमधील माणूस पुढे जात आहे. याचा अभिमान सामान्य माणसाला आहे. धंनजय मुंडे हेच बीड जिल्ह्याचे कणखरपणे नेतृत्व करू शकतात हे पुन्हा एकदा आजच्या अभुतपूर्व  स्वागताने सिध्द झाले आहे.
              सरकारमध्ये मंत्रीपदाची दुसऱ्यांदा संधी  मिळाल्याने सर्वांनाच आनंद झाला आहे. तो जाहीरपणे व्यक्तही झाला आहे.येत्या काही दिवसात ते बीड जिल्हयाचे पालकमंत्रीही होतील. बीड जिल्ह्यासाठी हे एक  नव विकास पर्व ठरेल. मायबाप जनतेचं प्रेम आणि हा विश्वास सार्थ करून दाखवू असा विश्वास धनंजय मुंडेंनीही विशाल जनसागरासमोर बोलताना  दिला आहे.आता जिल्ह्याचा आणि परळी मतदारसंघाचाही विकासात्मक कायापालट होईल तोही 'अभुतपूर्वच' अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार