युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

धरणे आंदोलनात शिक्षकांनी सहभागी व्हा-मराठवाडा शिक्षक संघ

 धरणे आंदोलनात शिक्षकांनी सहभागी व्हा-मराठवाडा शिक्षक संघ 




परळी / प्रतिनिधी


राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध मागण्यासाठी मराठवाड्यातील सर्व माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर मराठवाडा शिक्षक संघाकडून शुक्रवार दि 21 रोजी दुपारी 4 ते 6 या वेळेत धरणे/ निदर्शने आंदोलन करण्यात येणार असून या धरणे आंदोलनात परळी तालुक्यातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मराठवाडा शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष अनुप कुसुमकर (भावसार) यांनी केले आहे.


राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या अनेक मागण्या शासन आणि प्रशासन  दरबारी प्रलंबित असून मराठवाडा शिक्षक संघ सातत्याने या कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्नी पाठपुरावा करत आहे.

सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी, सर्व शाळांना 100% अनुदान देण्यात यावे, सातव्या वेतन आयोगाचा 3,4 थकित हप्ता त्वरित जमा करावा,2005 पूर्वी नियुक्त शिक्षक कर्मचारी यांची जीपीएफ खाती पुर्ववत सुरू करावी,इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 10,20,30, आश्वाशित प्रगती योजना शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांना लागू करावी,राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शिक्षण विभागाकडून कायम वैयक्तिक मान्यता द्याव्यात

या व इतर रास्त मागण्या. घेऊन पूर्ण मराठवाडयात शुक्रवार दि 21 रोजी जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर  हे आंदोलन करण्यात येणार असून या धरणे आंदोलनात परळी तालुक्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे तालुका अध्यक्ष अनुप कुसुमकर (भावसार),शहराध्यक्ष संजय गोरे,तालुका व शहर कार्यकारिणी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या