परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

 सैन्य दलात भरती झालेल्या निकीताची परळीत काढली भव्य मिरवणूक



परळी प्रतिनिधी.  शहरातील वडार कॉलनी येथील सामान्य कुटुंबातील निकिता अण्णासाहेब धोत्रे ही सैन्य दलात भरती झाल्याबद्दल परळी शहरात समाजाच्या वतीने भव्य मिरवणूक काढून तिचे जंगी स्वागत करण्यात आले. शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर असलेल्या वडार समाजातील मुलींनी शिक्षण घेऊन पुढे येण्याचे आवाहन याप्रसंगी निकिताने केले.

    याविषयी अधिक माहिती अशी की, वडार कॉलनी येथील अतिशय सामान्य कुटुंबात जन्मलेल्या निकिता अण्णासाहेब धोत्रे ही मुलगी भारतीय सैन्य दलात बीएसएफ मध्ये भरती झाली आहे.  वडार समाजामध्ये परळी तालुक्यात प्रथमच एका कन्येने सैन्य दलात भरती होण्याचा पराक्रम केला आहे.

   तिच्या या सैन्य दलातील भरती झाल्याचा समाजाला तसेच आई-वडिलांना प्रचंड आनंद झाला. वडील मेकॅनिक चे काम करतात तर आई मिळेल ती मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह  करतात. परंतु निकिताने शिक्षण घेऊन आई-वडिलांचे पांग फेडले आहे. या निमित्ताने निकिताचे ट्रॅक्टर मधून भव्य मिरवणूक काढण्यात आली. जागोजागी नागरिकांनी पुष्पहार घालून तिचे स्वागत केले व तिला शुभेच्छा दिल्या.

   वडार समाजाचा दगडफोडीचा पिढीजात व्यवसाय असल्याचे निकिताने सांगितले. समाजात विशेषतः मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण खूप कमी आहे. पालकांनी आपल्या मुलींना उच्च शिक्षण द्यावे त्या नक्कीच जीवनात यशस्वी होतील अशी भावना निकिताने याप्रसंगी व्यक्त केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!