लेखी आश्वासनानंतर किसान सभेचे बेमुदत धरणे आंदोलन स्थगित

 ●शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरीचे मस्टर 24 तासात जनरेट होणार


●लेखी आश्वासनानंतर किसान सभेचे बेमुदत धरणे आंदोलन स्थगित 


परळी / प्रतिनिधी


मोहा व तालुक्यातील गावच्या सिंचन विहीरींचे मस्टर व जिओस्टैगिंगसाठी जाणिवपूर्वक होत असणाऱ्या दफ्तरदिरंगाई विरोधात बीड जिल्हा किसान सभेने सोमवार दि 3 रोजी पंचायत समिती कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले.या आंदोलनाची धास्ती घेत पंचायत समिती प्रशासनाने सायंकाळच्या सुमारास आंदोलन कर्त्याशी चर्चा करून 24 तासात सिंचन विहिरीचे मस्टर जनरेट करण्यात येईल असे लेखी आश्वासन गट विकास अधिकारी संजय केंद्रे यांनी दिल्याने हे धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.


मोहा व परळी तालुक्यातील इतर गावातील रोजगार हमी योजनेतून जल सिंचन विहिरीच्या झालेल्या कामाचे चार नंबर फॉर्म भरून देऊनही मस्टर निघत नाहीत. बाकीच्या शेतकऱ्यांच्या विहिरीस प्रशासकीय मान्यता व स्थळ पाहणी होऊनही जिओ टॅगिंग करण्यास पंचायत समिती कार्यालयाकडून टाळाटाळ होत असल्याने याबाबत एप्रिल महिन्यात निवेदन देऊन ही आश्वासनाची अंमलबजावणी न झाल्याने अखिल भारतीय किसान सभेकडून सोमवार दि 3 रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले.सायंकाळी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय केंद्रे यांनी आंदोलन कर्त्यांशी चर्चा करून जुन्या चालू असलेल्या ७ विहिरीचे चे मस्टर यापूर्वी काढण्यात आलेले असल्याचे सांगत उर्वरित जे काही नवीन आर्थिक वर्षात २०२३-२४ मध्ये प्रस्ताव आलेले आहेत त्याला मान्यता देऊन जिओ टॅग करण्यात आलेले असून सदरील जिओ टॅग हे मस्टर जणरेट करण्यासाठी पाठविण्यात आलेले आहेत सिस्टीम मध्ये मस्टर जणरेट करण्यासाठी २४ तासाचा कालावधी लागत असल्याचं सागितलं. उर्वरित २१ मस्टर सिस्टीमने परवानगी दिली कि लगेच जणरेट करून आपले मस्टर निर्गमित करण्यात येतील असे लेखी आश्वासन आंदोलन कर्त्याना दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.


या बेमुदत आंदोलन प्रसंगी माकपचे जेष्ठ नेते कॉ.पी.एस.घाडगे,कॉ.एड.परमेश्वर गित्ते,कॉ.सुदाम शिंदे,कॉ.प्रवीण देशमुख,कॉ.विष्णू देशमुख, कॉ.विशाल देशमुख, कॉ.मदन वाघमारे, कॉ.शरद महाजन यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !