युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

 महसुल व पोलिस प्रशासनाची गोदापात्रात मोठी कार्यवाही: एक कोटीच्या मुद्देमालासह सहाजण ताब्यात 




गेवराई....

 तालुक्यातील राक्षसभुवन परिसरात मोठ्या प्रमाणात विना परवाना वाळू उपसा करून त्यांची तस्करी केली जात असल्याची माहिती महसुल व साहय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाला मिळाली होती त्यावरून आज ( दि 3 रोजी ) राक्षसभुवन याठिकाणी छापा टाकला व जवळपास एक कोटी चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सहा जणांना ताब्यात घेण्यात आले  असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले .


याबाबत सविस्तर माहिती अशी की , राक्षसभुवन परिसरात आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास  छापा टाकला यावेळी दोन हायवा , एक ट्रॅक्टर , एक सिपट डिजायर , एक स्कॉर्पियो , तिन मोटार सायकल सह लोकेशन करणारे सहाजण ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे सर्व मुद्देमाल व आरोपी गेवराई पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत सदरची कार्यवाही बीड तहसिलदार आदित्य जिवणे , साहय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत , नायब तहसीलदार सुहास हजारे , मंडळ अधिकारी काशीद , बालाजी दराडे , यांच्यासह अनेकजण या कार्यवाहीत सहभागी होते .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या