लर्निंग माईंड सेवाभावी संस्था करणार किशोरवयीन मुलींचे समुपदेशन - सेवकराम जाधव







परळी वैजनाथ (प्रतिनिधी)दि.6 - महाराष्ट्रासह देशाच्या वेगवेगळ्या भागात किशोरवयीन मुलींसह तरुण मुली फसव्या प्रेमाच्या आहारी जाऊन आपले आयुष्याचे वाटोळे करून घेत आहेत.मुलींच्या बाबतीत घडत असलेल्या अनुचित प्रकारांना आळा घालण्या करिता लर्निंग माईंड सेवाभावी संस्थेच्या वतीने किशोरवयीन मुलींचे समूपदेशन करण्यात येणार आहे.मुलींच्या बाबतीत झोप उडवणाऱ्या घटना दिवसेंदिवस उघडकीस येत आहेत.राज्याच्या विविध भागात घडत असलेल्या या अनुचित गोष्टींना आळा घालण्याकरीता किशोरवयीन मुला-मुलींचे समुपदेशन होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन लर्निंग माईंड सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सेवकराम जाधव यांनी केले.

किशोरवयातच मुलामुलींना संभाव्य धोक्याचे परिणाम समाजावले जाणे गरजेचे झाले आहे असेही ते म्हणाले आहेत.


आधुनिक युगात आपल्या ग्रामीण भागात शिक्षण व रोजगाराचा पर्याय उपलब्ध नसल्याने बहुसंख्य मुलींना घर सोडून बाहेर राहावे लागते.या काळातच किशोरवयीन मुली भावनेच्या किंवा समोरील व्यक्तीच्या स्वभावाच्या आहरी जाऊन कधीही भरून न निघणाऱ्या चुकीच्या गोष्टी हातून घडू शकतात. 

मात्र एकदा केलेल्या चुकीमुळे भविष्यात होणारे गंभीर परिणाम समाजाने पाहिलेले आहेत.यात अनेक मुलींनी आपला जीवही गमावला आहे.या सर्व प्रकारांना आळा घालण्या करीता लर्निंग माईंड सेवाभावी संस्थेच्या वतीने किशोरवयीन मुलींचे समूपदेशन करण्याचा ठराव नुकताच झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.संस्थेचे अध्यक्ष सेवकराम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीसाठी संस्थेच्या सचिव सीमा पाटील, उपाध्यक्ष विश्वजीत मुंडे,सदस्य - सुरेश गायकवाड पाटील, विजय कदम, निर्मला जाधव आदी उपस्थित होते.


-----------------------------------------------------





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !