फटाके फोडून, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा

 धनंजय मुंडेंच्या शपथविधीनंतर परळीसह बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी समर्थकांचा जल्लोष!

फटाके फोडून, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा


परळी वैद्यनाथ (दि. 02) - आज मुंबई येथे राजभवनात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात आ.धनंजय मुंडे यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी परळीसह बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी जोरदार जल्लोष केला आहे.


परळी वैद्यनाथ शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर, धनंजय मुंडे यांचे संपर्क कार्यालय या ठिकाणी पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकत्र येत आनंद साजरा केला. यावेळी फटाके फोडून, एकमेकांना पेढे भरवून जोरदार जल्लोष करण्यात आला.


त्याचबरोबर बीड शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात देखील धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले. 


बीड शहरासह अंबाजोगाई, पाटोदा, वडवणी, धारूर, आदी ठिकठिकाणी धनंजय मुंडे यांच्या मंत्री पदी नियुक्तीनंतर कार्यकर्त्यांनी ढोल-ताशे व फटाके वाजवत, गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केल्याचे पाहायला मिळाले. 


दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात धनंजय मुंडे पुन्हा एकदा नामदार झाले. त्यांनी शपथविधी नंतर आगामी काळात बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याचे मागासलेपण दूर व्हावे, यासाठी आपला प्रत्येक क्षण समर्पित असेल, असे मत ट्विट द्वारे व्यक्त केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार