वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थान: मोरारी बापुंच्या विधानानंतर काशी जगद्गुरुंनी केले महत्त्वपूर्ण विधान

 देव एकच पण भेदभाव करू नका; परळी वैजनाथ हेच ज्योतिर्लिंग स्थान-काशी जगद्गुरु डॉ चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी 



परळी वैजनाथ,प्रतिनिधी.....

   देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी परळीचेच श्री वैजनाथ ज्योतिर्लिंग एक आहे, आरोग्य सुदृढ राहण्यासाठी श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे सर्व भाविक दर्शन घेऊन आशीर्वाद घेतात ,वैद्यांचा वैद्य श्री वैद्यनाथ येथे असल्याने श्री वैद्यनाथाच्या दर्शनामुळे भाविकांना सर्व सुख प्राप्त होते परंतु कोणीही देवाच्या बाबतीत भेदभाव करू नये, हिंदू धर्मात सर्व समाजाचा देव एकच आहे रूपे अनेक आहेत,नावे अनेक आहेत,असे त्यांनी स्पष्ट केले. बिहारमध्ये श्री वैद्यनाथ धाम असुन काही जण त्यालाच ज्योतिर्लिंग स्थान म्हणतात परंतु परळी वैजनाथ हेच ज्योतिर्लिंग स्थान असल्याचे स्पष्ट करुन काशी जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी सांगितले की, आद्य शंकराचार्यांनी  12 ज्योतिर्लिंगाची जेव्हा स्तुस्ती केली त्यात "परल्याम् वैद्यनाथंच्" म्हणजे परळी वैजनाथ (महाराष्ट्र) असा उल्लेख केलेला आहे असे ही जगद्गुरू यांनी परळीतील आपल्या आशीर्वाचनात सांगितले आहे.

      पुरुषोत्तम मासाचे महत्त्व सांगताना काशी जगद्गुरु म्हणाले की पुरुषोत्तममासा मध्ये यात्रा ,देवाचे नामस्मरण जप ,तप केल्याने दुपटीने आशीर्वाद मिळतो. पुरुषोत्तम मासामध्ये गृहप्रवेश, लग्नकार्य व नवीन दुकानाच्या शुभारंभ करता येत नाही असे ही त्यांनी सांगितले श्री वैजनाथ मंदिर समोरील नवीन प्रवचन मंडपात श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्ट परळी यांच्या वतीने गुरुवार दिनांक 27 जुलै रोजी श्री श्री श्री 1008 श्री क्षेत्र काशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या उपस्थितीत सामूहिक ईष्टलिंग महापूजा व आध्यात्मिक आशीर्वाचन झाले. श्री ष.ब्र. 108 नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज मठ संस्थान सोनपेठ , श्री ष. ब्र.१०८ श्री गुरुसिध्द मणीकंठ शिवाचार्य दहीवडकर उपस्थित होते. श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने काशी जगदगुरुंचे स्वागत करण्यात आले, या कार्यक्रमास भावीक भक्तांची मोठी उपस्थिती होती .

    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्ट सेक्रेटरी प्रा बाबासाहेब देशमुख विश्वस्त राजेश देशमुख विजयकुमार मेनकुदळे,प्रदीप देशमुख, नंदकिशोर जाजू ,अनिल तांदळे, डॉक्टर गुरुप्रसाद देशपांडे रघुवीर देशमुख, नागनाथराव देशमुख श्री पुजारी यांनी परिश्रम घेतले तसेच वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने काशी जगद्गुरु चे स्वागत करण्यात आले व असंख्य भाविकांनी रांगेत थांबून त्यांचे दर्शन घेतले .यावेळी वीर लिंगायत समाजाचे नेते डॉक्टर सुरेश चौधरी, श्री संत गुरुलिंग स्वामी मठ संस्थान अध्यक्ष दत्तापा इटके, सेक्रेटरी अडवोकेट गिरीश चौधरी ,चेतन सौंदळे नागापूरचे मनोज एसके , परळीचे मठपती गणेश स्वामी ,दयानंद स्वामी, ओमप्रकाश बुरांडे, महादेव इटके, चेतन सौंदळे, सुरेश टाक, रमेश चौंडे, श्याम बुद्रे,गडेकरबंधू,राजेश्वर तीळकरी ,अनिकेत तीळकरी , आश्विन मोगरकर,विजय मोगरकर, पोपडे आप्पा व वैद्यनाथ मंदिर परिसरातील सर्व व्यवसायीक उपस्थित होते.

•••








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार