प्रख्यात लोककला अभ्यासक प्रा. डॉ.गणेश चंदनशिवे यांना  "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार" जाहीर




भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सन १९४५ मध्ये स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी,मुंबई तर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो. या वर्षी २०२३-२०२४ चा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा प्रतिष्ठेचा मानला जाणारा पुरस्कार प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे, विभाग प्रमुख लोककला

अकादमी मुंबई विद्यापीठ यांना लोककलेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जाहीर झाला आहे.

   हा  पुरस्कार प्रदान सोहळा दिनांक ०८/०७/२०२३ रोजी सायंकाळी ३ ते ६ या वेळेत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, नरीमन पॉइंट, मुंबई इथे माननीय महामहीम राज्यपाल श्री. रमेश बैसजी, महाराष्ट्र राज्य मुंबई

यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळा केंद्रीय राज्यमंत्री सामाजिक व न्याय विभाग, भारत सरकार  मा.रामदासजी आठवले यांच्या  अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.

   या कार्यक्रमास डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे जगभरातील अनुयायी उपस्थित राहणार आहेत. प्रा.डॉ गणेश चंदनशिवे यांच्या निवडीची घोषणा पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय केंद्रीय राज्य मंत्री सामाजिक व न्याय विभाग, भारत सरकार आयु.रामदासजी आठवले, उपाध्यक्ष  पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात,माजी अध्यक्ष यु.जी.सी  तसेच संस्थेचे सदस्य संस्थाचालक पद्मश्री ॲड.उज्ज्वल निकम, ॲड बाबुराव बर्वे, श्री. एस.आर कृष्णाप्पा, डॉ.वासुदेव गाडे, डॉ. पद्माकर ई. गायकवाड, प्रा. एस. एल. भागवत यांनी एक मताने केली. अशी माहिती संस्थेचे सहाय्यक सचिव डॉ. उमाजी म्हस्के यांनी दिली.

      लोकलेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल यापूर्वी डॉ. गणेश चंदनशिवे यांना भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीचा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईचा कलारंग पुरस्कार, भूमिपुत्र फाउंडेशनचा लोकसाहित्य कलारत्न पुरस्कार, पुणे गंधर्व परिवाराचा पुरस्कार, मराठवाडा भूषण पुरस्कार, राज्यस्तरीय तिफण पुरस्कार, दिव्यरत्न आदर्श जीवन गौरव पुरस्कार, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कला गौरव पुरस्कार, सम्यक पुरस्कार पुणे, शारदा पुरस्कार, यशवंत पुरस्कार असे अनेक राज्य-राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळालेले आहेत.

    विश्वभूषण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर

यांच्या नावे दिला जाणारा मानाचा पुरस्कार प्रा.डॉ.गणेश चंदनशिवे यांना जाहीर झाल्यामुळे तमाम महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील लोकगायक, विद्यार्थी,शाहीर आणि लोककला क्षेत्रातील लोककलावंतानी डॉ.गणेश चंदनशिवे यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !