परळी नगर परिषदेतील घोटाळेबाज अधिकाऱ्यांची प्रकरण बाहेर काढणार : व्यंकटेश शिंदे





परळी (प्रतिनिधी): महाराष्ट्रात नावाजलेली परळी नगर परिषद भ्रष्टाचाराचे माहेर घर बनली असून शेकडो कोटी च्या योजनेतून परळी शहराचा चेहरा मोहरा बदलण्याच्या संकल्पनेला भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले आहे. विविध योजनांतून करण्यात आलेल्या बोगस कामाची बिले टक्केवारी घेऊन काढली जात आहेत. विविध योजनेच्या माध्यमातून खर्च करण्यात आलेल्या निधी चे लेखा परिक्षका मार्फत परीक्षण करून जनतेसमोर श्वेत पत्रिका जाहीर करा.  त्याचं बरोबर वर्षांनुवर्षे परळीत ठान मांडून बसलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संपत्ती ची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे व्यंकटेश शिंदे यांनी सांगितले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेला परळी नगर परिषदेतील अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराचे ग्रहण लावले आहे. प्रधानमंत्री आवास योजना गरिबांसाठी आहे की अधिकाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी आहे असा सवाल शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी उपस्थीत केला आहे. 

     महाविकास आघाडी सरकार च्या माध्यमातुन परळी शहरांतील हजारो लाभार्थ्यांना प्रधान मंत्री आवास योजनेचा लाभ मिळाला परंतु भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या लाच खाऊ धोरणामुळे घरकुल योजनेचे लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत. टेबला खालच्या लाचेवर पोटच्या पोरा सारखा अधिकार सांगणाऱ्या अधिकाऱ्यामुळे परळी नगर परिषद भ्रष्टाचाराचे केंद्र बनली आहे. लाच मिळाली तर नियमांना पायदळी तुडवले जाते अन लाच मिळाली नाही तर नियम व अटी सांगून लाभार्थ्यांना सरळ बाहेरचा रस्ता दाखवण्यात येतो. अभियंत्या पासून जिओ टॅग करणाऱ्या पर्यंत च्या अधिकाऱ्यांना 

प्रधानमंत्री आवास योजना वर कमाई चे साधन बनली आहे. परळी नगर परिषद मध्ये घरकुल मंजुरीसाठी लाभार्थ्याकडून सर्रास पैसे घेतले जात असून या प्रकरणी नप मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांच्या समोर तक्रार केल्या नंतर लाच घेणाऱ्या व्यक्तीला समक्ष उभ करून जवाब घेतला असता त्याच्या सांगण्यावरून लाचेच्या प्रत्येक रक्कमे चे विभाजन कसे करण्यात येते हेही स्पष्ट केले तरीही संबधित घरकुल विभागातील कर्मचाऱ्यावर कसल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही याचा अर्थ त्या लाचेचे मुख्याधिकारी ही हिस्सेदार आहेत का असा संशय उपस्थित होत आहे. तीर्थ क्षेत्र विकास योजनेतील भक्त निवासाचे काम कालावधी उलटला तरीही पूर्ण का झाले नाही.  डॉ भालचंद्र वाचनालय इमारतीचे काम पूर्ण झाले असून अद्यापर्यंत तिचे हस्तांतरन का झाले नाही असा प्रश्न व्यंकटेश शिंदे यांनी उपस्थित केला आहे. परळी नगर परिषद हद्दीतील नगरोत्थान, वैशिष्टपूर्ण, भुयारी गटार, यासह विविध योजनेत अधिकाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार जनतेसमोर उघड करणार असल्याचे व्यंकटेश शिंदे यांनी सांगितले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार