द्वादश पंचम् ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथाची प्रतिमा देवून मुख्यमंत्र्यांचा सत्कार

आपत्तीग्रस्तांसाठी निधी  : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना १० लक्ष रुपयाचा सहाय्यता निधी सुपूर्द 


        राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून रायगड जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त "ईरशाळवाडी" गावाच्या उभारणीसाठी १० लक्ष रुपयाचा सहाय्यता निधीचा धनाकर्ष सुपूर्द करण्यात आला.


रायगड जिल्ह्यातील "ईरशाळवाडी" येथे दरड कोसळून आपले अनेक बांधव मृत्युमूखी पडले होते.ईरशाळवाडी गावाच्या नव्याने उभारणी करण्याकरीता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांना १० लक्ष रुपयाचा निधी परळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्याचे कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे  यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला यावेळी विधिमंडळ येथे उपस्थित राहण्याचा योग आला.


मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांना ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथांची प्रतिमा यावेळी देण्यात आली तसेच मुख्यमंत्र्यांना परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग विकास कार्यास २८८ कोटींचा वाढीव तिथक्षेत्र योजना मंजूर केल्याबद्दल सर्वांनी आभार व्यक्त करीत परळी मध्ये येण्याचे निमंत्रण दिले.


राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी रायगड जिल्ह्यातील दुर्घटना घडल्यामुळे त्यांचा वाढदिवस साजरा न करता "ईरशाळवाडी" या गावाच्या उभारणी करण्याकरीता सहकार्य करावे हे आवाहन केले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत राज्याचे कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे  यांच्या नेतृत्वाखाली तसेच परळी नगर पालिकेचे गटनेते वाल्मीकअण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली परळी राष्ट्रवादी काँग्रेसने १० लक्ष रुपये निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिला.


आज विधिमंडळात मुख्यमंत्री दालनात कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे ,माजी आमदार संजय दौंड,बीड जिल्हाध्यक्ष ॲड.राजेश्वर आबा चव्हाण,ज्येष्ठ नेते राजकिशोर उर्फ पापा मोदी,तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके,शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,ज्येष्ठ नेते राजपाल लोमटे,अंबेजोगाई तालुकाध्यक्ष तानाजी देशमुख,युवक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गोविंद कराड,माजी नगरसेवक राजेंद्र सोनी,जितेंद्र नव्हाडे,संदीप दिवटे,सचिन कराड,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

•••

VIDEO NEWS GALLERY 













टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !