युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

नजीकच्या भविष्यात अंबाजोगाई जिल्हा होणे केवळ अशक्य

 जिल्हा विभाजनाचे निकष शासनाने जाहिर करावे; नजीकच्या भविष्यात अंबाजोगाई जिल्हा होणे केवळ अशक्य-अ‍ॅड.अतुल तांदळे




परळी वैजनाथ (प्रतिनिधी) सध्या सोशल मिडीयावर अंबाजोगाई जिल्हा निर्मितीबाबत एक पत्र फिरवले जात आहे. या अनुषंगाने शासनाने जिल्हा विभाजनाचे निकष जाहिर करावे तसेच शासकीय समितीचा अहवाल देखील सार्वजनिक करावा अशी मागणी परळी जिल्हा निर्मिती कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड.अतुल तांदळे यांनी केली आहे. नजीकच्या भविष्यात अंबाजोगाई जिल्हा होणे केवळ अशक्य असल्याचे प्रतिपादन अ‍ॅड.अतुल तांदळे यांनी केले.


 गेल्या 2 दिवसापासून समाज माध्यमांवर बीड जिल्हा विभाजनाबाबत चर्चांना उधाण आले आहे. याबाबत जिल्हा निर्मिती कृती समितीने संबंधीत यंत्रणेकडे चौकशी केली असता महाराष्ट्रातील नवीन जिल्हा निर्मिती बाबत शासनाकडे कोणतेही स्वरुपाचे निकष नसल्यामुळे मा.अप्पर सचिव (महसुल) यांच्या अध्यक्षतेखाली एखाद्या जिल्ह्याचे विभाजन करुन नविन जिल्हा निर्मिती करण्याबाबत कोणते निकष असावे यासाठी एक समिती नेमली होती. याबाबत समितीने आपला अहवाल शासनकडे दिला असल्याचे समजते. शासनाने निकषास मान्यता दिल्यानंतर निश्‍चित केलेल्या निकषाप्रमाणे महाराष्ट्रात नवीन जिल्हा निर्मिती बाबत प्रक्रिया सुरु होईल अशी माहिती अ‍ॅड.अतुल तांदळे यांनी दिली आहे. तसेच नविन जिल्हा निर्मितीसाठीचे निकष शासनाने जाहिर करावे अशी मागणी देखील अ‍ॅड. तांदळे यांनी केली आहे.  यासर्व पार्श्‍वभूमीवर अकारण होत असलेल्या चर्चा या निव्वळ व्यर्थ आहे असेच म्हणावे लागेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या