युवकांचा स्तुत्य उपक्रम....

इमेज
  महेश नवमीनिमित्त माहेश्वरी मित्र परिवारातर्फे गुरुकुलातील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप परळी वैजनाथ: प्रतिनिधी.... दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महेश नवमीचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी श्रद्धानंद गुरुकुल येथील विद्यार्थ्यांना खेळ साहित्याचे वाटप करण्यात आले. युवकांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा सेवा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धांत मंत्री, केदार सारडा, हर्ष भंडारी, रुपेश बंग, अथर्व कलंत्री, अनिकेत सारडा, श्याम बजाज, यश डीडवाणी, श्रीनिवास जाजू, युवराज जाजू, गोकुल भंसाली, गणेश सोनी, तेजस इनदानी, जय तोष्णीवाल, यश लोढा तसेच समस्त माहेश्वरी मित्र परिवाराचे विशेष सहकार्य लाभले. माहेश्वरी मित्र परिवारातर्फे सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहे. समाजसेवा आणि सुसंस्कारांचे हे कार्य आपण सर्वांच्या साथीने असेच पुढे सुरू ठेवूया, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बुधवारी मुंबईत होणाऱ्या बैठकीस उपस्थित राहा - मंत्री धनंजय मुंडे यांचे आवाहन




*नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खा.प्रफुल पटेल यांसह प्रमुख नेते राहणार उपस्थित*


मुंबई (दि. 04) - उद्या बुधवार दि. 05 जुलै, 2023 रोजी, सकाळी 11.00 वा. मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले असून, या बैठकीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कार्याध्यक्ष खा. प्रफुल पटेल, मंत्री दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांसह यांसह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या बैठकीस बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील सर्व आजी-माजी खासदार/आमदार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.


या बैठकीत राज्याच्या सध्याच्या स्थितीसह आगामी काळात अंगीकृत करावयाची ध्येय धोरणे, कार्यकारिणी यांसह विविध महत्वपूर्ण बाबींविषयी चर्चा होणार असून, या बैठकीस बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील सर्व आजी-माजी खासदार/आमदार महोदय, सर्व पदाधिकारी, विविध आघाडी व फ्रंटल सेलचे पदाधिकारी व सहकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले असून, सदर कार्यक्रमाचे स्थळ खालील प्रमाणे आहे.


*स्थळ - एम. ई. टी. भुजबळ नॉलेज सिटी, लीलावती हॉस्पिटल समोर, बांद्रा पश्चिम, मुंबई*


*गुगल मॅप लिंक - https://maps.app.goo.gl/Gje7DiWpvQd4gWgD9?g_st=iw* 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या