व्हिडिओ व्हायरल; अरोही वर कौतुकाचा वर्षाव

मंत्री धनंजय मुंडे यांना चिमुकलीच्या इंग्रजीत शुभेच्छा


व्हिडिओ व्हायरल; अरोही वर कौतुकाचा वर्षाव

परळी / प्रतिनिधी

राज्यात नव्याने घडलेल्या राजकीय घडामोडीत परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांची वर्षभरानंतर पुन्हा मंत्रीपदावर वर्णी लागली आहे. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना एका चिमुकलीचे लडीवाळ आणि अस्खलित इंग्रजीतील शुभेच्छापर बोल सर्वांचे लक्षवेधून घेत असून, त्याची परळीतील गणेशपार या जुन्या भागातील नागरिकांमध्ये कौतुकाने चर्चा होत आहे.

अरोही अनंत कुलकर्णी, असे या चिमुकलीचे नाव आहे. लावण्याई  पब्लिक स्कूलमध्ये दुसरीत शिकणाऱ्या अरोही ने इंग्रजीत शुभेच्छा देताना म्हटलेय की, मंत्री धनंजय मुंडे हे माझे आवडते नेते आहेत. त्यांची राज्याच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली असून त्यांच्याकडून राज्याच्या विकासात मोठे काम होईल.  

परळीच्या गणेशपार भागातील चुणचुणीत चिमुकली अरोही ही बीडच्या लोकप्रभा या  वर्तमानपत्राचे उपसंपादक कुलकर्णी यांची कन्या आहे. दिवसभरातील बहुतांशवेळ  अरोही इंग्रजीतच संभाषण करते. इंग्रजी बोलणे हा आपला आवडता छंद असून प्रत्यक्ष भेटीतही धनंजय मुंडे यांना इंग्रजीत शुभेच्छा आणि संवाद साधेल, असे  अरोही ने सांगितले.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !