इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील शेतकऱ्यांशी साधणार संवाद

 पीएम किसान योजनेतील लाभार्थींना एका क्लिकवर 14 व्या हप्त्याचे गुरुवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते वितरण

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी ऑनलाइन वेबलिंकद्वारे या 'किसान संमेलना'स सहभागी होण्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आवाहन


पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील शेतकऱ्यांशी साधणार संवाद


मुंबई (दि. 26) - देशाचे पंतप्रधान यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 27) सकाळी 11 वा. राजस्थान मधील सीकर येथे केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या वतीने आयोजित 'पीएम किसान संमेलन' कार्यक्रमाच्या निमित्ताने पीएम किसान सन्मान योजनेतील 8.5 कोटी लाभार्थींच्या खात्यावर पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्याची रक्कम एका क्लिक द्वारे वितरित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी वेबलिंकच्या माध्यमातून सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 2019 साली शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने पीएम किसान योजना सुरू करण्यात आली. याद्वारे देशातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात दरवर्षी 6 हजार रुपयांचे अर्थसहाय्य तीन हप्त्यात देण्यात येते. 


या योजनेच्या माध्यमातून प्रत्येकी 2 हजार रुपयांचे एकूण 13 हप्ते 11 कोटी शेतकऱ्यांना अशी एकूण  2 लाख 42 हजार कोटी रुपये रक्कम आतापर्यंत वितरित करण्यात आली असून, गुरुवारी 14 व्या हप्त्यापोटी साडे आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 18 हजार कोटी रुपये निधी वितरीत करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या किसान संमेलनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. 


या कार्यक्रमात राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी वेबलिंकच्या माध्यमातून सहभागी व्हावे, असे आवाहन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. 


किसान संमेलनाची वेबलिंक - http://pmevents.ncog.gov.in/


•••




टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!