तीन दिवसीय ईष्टलिंग पुजा व अनुष्ठान

 पुजा सार्थकी लागण्यासाठी भक्ती ही  सर्वश्रेष्ठ - श्रीशैल्य जगद्गुरु महास्वामीजी         


   परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

        ईष्टलिंग  धारण केल्याने प्रेरणा मिळते असे सांगून   देवाची पूजा करताना जल,बेल, आगरबती, फुल अश्या सामुग्री सोबतच भक्ती आवश्यक आहे,भक्ती शिवाय पूजा पूर्ण होऊ शकत नाही ,मनात भक्ती हवी तरच पूजा सार्थकी लागते म्हणून भक्ती ही सर्वश्रेष्ठ समजले जाते असे विचार श्री श्री श्री  1008 सूर्य सिंहासनाधीश्वर जगद्गुरु डॉक्टर चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी श्रीशैल पीठ  यांनी येथे आपल्या आशीर्वाचनात मांडले येथील हालगे गार्डन मध्ये वीरशैव लिंगायत समाज परळी च्या वतीने जगद्गुरू यांच्या   उपस्थितीत ईष्टलिंग  महापूजा व तीन दिवसीय अनुष्ठानचे परळीत आयोजन करण्यात आले आहे . दि 21 जुलै रोजी सकाळी ईष्टलिंग  महापूजा करण्यात आली ,ईष्टलिंग  महापूजा जगद्गुरू महास्वामी यांच्या हस्ते करण्यात आली ,या वेळी परळी चे माजी नगराध्यक्ष सोमनाथअप्पा हालगे व नगराध्यक्षा सरोजिनी सोमनाथ अप्पा हालगे हे दाम्पत्य उपस्थित होते,    उपस्थित  भाविकांना जगद्गुरू महास्वामी यांच्या हस्ते तीर्थ प्रसाद देण्यात आला यावेळी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती या नंतर जगद्गुरू महास्वामी यांचे आशीर्वचन  झाले. यावेळी त्यांनी ईष्टलिंगाचे महत्व सांगितले, ईष्टलिंग  धारण केल्याने प्रेरणा मिळते असे ते म्हणाले, यावेळी श्री शंभूलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाई , नंदीकेश्वर शिवाचार्य महाराज ,  माजलगावकर ,अमृतेश्वरशिवाचार्य महाराज जिंतूरकर व्यासपीठावर उपस्थित होते,कार्यक्रमास अनुष्ठान समितीचे मार्गदर्शक दत्तापा इटके ,विजय कुमार मेनकुदळे,सोमनाथअप्पा हालगे,व अनुष्ठान समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते,कार्यक्रमाचे संचालन  मीडिया अँकर वैशाली रुईकर यांनी केले.श्री श्री श्री  1008 सूर्य सिंहासनाधीश्वर जगद्गुरु डॉक्टर चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांची शुक्रवारी शहरातील सामाजीक कार्यकर्ते  मनोज संकाये, विकास हालगे, नारायणआप्पा खके, शिरीष चौधरी, केदार तरवडगे, सुर्यकांतआप्पा कांचनगिरी, निलेश हालगे, पवन तोडकरी यांच्या निवासस्थानी पाद्य पूजा करण्यात आली यावेळी  जगदगरू महास्वामीजी यांचे स्वागत करून यावेळी त्यांनी कुटूंबाना आशीर्वाद दिले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !