राधा मोहन साथी प्रतिष्ठान व साधू वासवानी मिशनचा उपक्रम

 परळीत मोफत कृत्रिम हात व पाय शिबिराचे आयोजन


राधा मोहन साथी प्रतिष्ठान व साधू वासवानी मिशनचा उपक्रम

परळी/ प्रतिनिधी

राधा मोहन साथी प्रतिष्ठान व साधू वासवानी मिशन पुणे यांच्या वतीने रविवार दिनांक 16 जुलै रोजी परळी येथे दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत कृत्रिम हात व पाय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात आर्टिफिशियल लिंब कॅम्प म्हणजेच कृत्रिम हात आणि पाय उपलब्ध करून दिले जाणार आहेत. हात व पाय नसल्यामुळे अनेक जणांना आपले जीवन जगताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. नवीन तंत्रज्ञानामुळे कृत्रिम हात व पाय बसवून पुन्हा एकदा जीवनात भरारी घेता येऊ शकते. गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन राधा मोहन साथी प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी केले आहे. रविवार दिनांक 16 जुलै रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत औद्योगिक वसाहत नाथ रोड परळी येथे हे शिबिर होणार आहे. या शिबिरासाठी नाव नोंदणी आवश्यक असून दिव्यांगांनी आपली नाव नोंदणी ओमप्रकाश बुरांडे, प्रशांत जोशी, आनंद हाडबे,प्रकाश वर्मा ,राजेश मोदानी,आनंद तूपसमुद्रे यांच्याकडे करावी असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार